Mumbai, Thane, Pune Rains and Weather Live updates : धरणाचे दरवाजे उघडताच, अजितदादा पुण्यात पोहोचले!
Maharashtra Mumbai Weather Forecast live : 25 जुलै रोजी मुंबईसह महाराष्ट्रात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील हवामानासह इतर महत्त्वाच्या बातम्याचे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Maharashtra Weather Updates Live : मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर पोहोचली आहे. राधानगरी धरण देखील 98 टक्के पेक्षा जास्त भरले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज दुपारपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील हवामानाच्या बातम्यासह इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...
ADVERTISEMENT
- 04:28 PM • 25 Jul 2024
DCM Ajit Pawar : धरणाचे दरवाजे उघडताच, अजित दादा पुण्यात पोहोचले!
- 03:53 PM • 25 Jul 2024
CM Eknath Shinde: महाराष्ट्रातल्या पूरस्थितीवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“मुंबई, पुणे, रायगड इथे जास्त पाऊस पडतोय. सर्व प्रशासनाला सकाळपासून सूचना केल्या आहेत. अर्लट मोडवर राहून प्रशासनाला लोकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धरण, कॅचमेंट एरियात खूप पाऊस झाला. त्याचा डबल फटका बसला. लष्कर, नौदल एअर फोर्सची बचाव पथकं सज्ज आहेत. गरजेनुसार लगेच पावल उचलली जातायत. आपातकालीन परिस्थिती ओढवली, तर लोकांना एअरलिफ्ट केलं जाईल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
- 12:02 PM • 25 Jul 2024
Maharashtra Rain Alert: रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट
कालपासून जिल्ह्याभरात सरींवर पाऊस
जिल्ह्यात 2223 मीटर पाऊस
एकूण पावसाच्या 66% पाऊस पूर्ण
मंडणगड तालुक्यात सर्वात जास्त पाऊस
मंडणगड तालुक्यात 3896 मिलिमीटर पाऊस
त्या खालोखाल दापोलीमध्ये 3585 मिलिमीटर पाऊस
- 11:40 AM • 25 Jul 2024
Raigad Rain Alert : रायगड ताम्हिणी घाटात कोसळली दरड, एकाचा मृत्यू
माणगाव पुणे रस्त्यालगत असलेल्या धाब्यावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. ही दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरड बाजूला करण्यास आणखी 4 ते 5 तास लागणार आहेत. दरम्यान माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ताम्हिणी घाटात आधारवाडी गावाजवळ ही दरड कोसळली.
- 10:49 AM • 25 Jul 2024
Pune Rain Alert: पवना नदी दुथडी भरुन वाहू लागली
पिंपरी चिंचवड शहरासह पवना धरण क्षेत्रामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळे पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. शहराच्या काही भागांमध्ये पवना नदीचे पाणी रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे.
- 10:29 AM • 25 Jul 2024
CM Eknath Shinde: 'कामाशिवाय घरा बाहेर पडू नका'; मुंख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचत व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करावी. राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे. नागरिकांसाठी बचाव व मदत तात्काळ पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
- 10:26 AM • 25 Jul 2024
Maharashtra Rain Alert: महाबळेश्वरमधील पर्यटन पॉईंटस बंद
महाबळेश्वर मध्ये हंगामातील उचांकी १२.९९ इंच पावसाची नोंद
आजअखेर १२५ इंच पाऊस …
अर्थातच 3189 मिलिमीटर चा पावसाची नोंद झाली आहेजिल्हाधिकारी : प्रशासनाकडून पथक स्थापन
जिल्ह्याच्या पश्चिम भागात - संततधार सुरू आहे. महाबळेश्वरसह • बऱ्याच पाईंट वर पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी व पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध विभागांचे संयुक्त पथक स्थापन केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांची गर्दी असणारे महाबळेश्वरमधील सर्वच काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत काही पर्यटक जीव धोक्यात घालून पावसाळी पर्यटन करत असल्याने त्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उपाययोजनेचा निर्णय घेतला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्ह्याच्या पश्चिम भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे
कोयना धरणात ७१ टीएमसी पाणीसाठा
कोयना धरणांत प्रतिसेकंद सरासरी ५५,५२२ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणात बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७०.९६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद १,०५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मागील २४ तासांत पाणीसाठ्यात ४.७९ टीएमसीने वाढ झाली. मंगळवारी चोवीस तासात व आजपर्यंतचा एकूण पाऊस कंसात : कोयना १६८ मि.मी. (२९६१), नवजा २२६ (३४९१) तर महाबळेश्वर (3189). Mm
- 09:24 AM • 25 Jul 2024
Mumbai Rain Update : उल्हास नदीने ओलांडली इशारा पातळी
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण नगर मार्गावरील रायते पुलाला नदीचे पाणी लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हासनदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे.उल्हास नदीची पातळी वाढल्यास कल्याण नगर मार्गावरील रायते पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.
- 09:23 AM • 25 Jul 2024
Mumbai Rain Update: कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात
कल्याण डोंबिवलीत कल्याण ग्रामीण परिसराला काल पावसाने चांगलच झोडपून काढल होतं. रात्री मुसळधार पाऊस सुरु होता. पहाटे पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र अर्ध्या तासापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. यामुळे स्टेशन परिसरात पाणी साचायला सुरवात झाली आहे.
- 09:23 AM • 25 Jul 2024
Mumbai Rain Alert: पुढील 24 तास मुंबई-उपनगरात मुसळधार पाऊस, IMDचा अंदाज
पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वारे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT