PM Modi Anushthan : मोदी करणार आहेत ते 11 दिवसांचं अनुष्ठान नेमकं काय?
PM Modi Anushthan in Marathi : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ दिवसांचा अनुष्ठान विधी करणार आहे.
ADVERTISEMENT

PM Modi Anushthan in Marathi : अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑडिओ संदेश जारी केला. या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, 22 जानेवारीला आपण त्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होऊ ज्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. याचवेळी मोदींनी एक घोषणा केली की, अभिषेक करण्यापूर्वी ते 11 दिवसांचे अनुष्ठान विशेष विधी करणार आहेत, जे तपस्वी सारखे असेल. माझ्या भावना शब्दात मांडणे खूप अवघड आहे, पण मी माझ्या बाजूने प्रयत्न केले आहेत, असे ते म्हणालेत.
काय आहे अनुष्ठानचे महत्व?
मोदी करत असलेल्या अनुष्ठान का करतात, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्तित होत आहे. शास्त्रात देवाच्या मूर्तीचा अभिषेक करणे हा एक तपशीलवार आणि सर्वसमावेशक विधि आहे. यासाठी सविस्तर नियम दिले आहेत जे अभिषेक करण्यापूर्वी अनेक दिवस पाळावे लागतात.
हेही वाचा >> ठाकरेंच्या सहीचा AB फॉर्म शिंदेंना कसा चालला? नार्वेकर म्हणाले…
मोदींनी ठरवले आहे की, सर्व व्यस्तता आणि जबाबदाऱ्या असूनही, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सर्व नियम आणि तपश्चर्या पाळायच्या आणि त्याआधी धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे त्यांचं दृढनिश्चयाने ते पालन करायचं. त्यासाठी पंतप्रधानांनीविधी पुढील 11 दिवसांचा यम-नियम पालन अनुष्ठान सुरू केले आहे.
देव प्रतिष्ठेला पार्थिव मूर्तीमध्ये दैवी चेतना आणण्याचा विधी असे वर्णन केले आहे. यासाठी धर्मग्रंथात विधीपूर्वी उपवास करण्याचे नियम दिले आहेत.पंतप्रधान आपल्या दैनंदिन दिनचर्येत ब्रह्ममुहूर्त जागरण, साधना आणि सात्विक आहार या नियमांचे सतत पालन करतात. पण, पंतप्रधानांनी विधी म्हणून सर्व 11 दिवस कठोर तपश्चर्या करून उपवास करण्याचा निर्णय घेतला आहे.










