Pooja Khedkar : ''...तर सगळ्यांना आत टाकेन'', पूजा खेडकरांच्या आईची दमदाटी

मुंबई तक

ADVERTISEMENT

pooja khedkar mother threatened while pune police reach house going to take action against audi car
पूणे पोलीस आज कारवाईसाठी पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती.
social share
google news

Pooja Khedkar Mother Video Viral : ओंकार वाबळे, पुणे :  महाराष्ट्र कॅडरच्या 2023 बँचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबतीत नवनवीन कारनामे समोर येतच असतानाचा आता पूजा खेडकर यांच्या आईने दमदाटी केल्याची बातमी समोर आली आहे. पुणे पोलीस आज कारवाईसाठी पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. यावेळी मिडिया देखील या घटनेचे कव्हरेज करण्यासाठी तेथे उपस्थित होती. त्यामुळे पूजा खेडकर (Pooja Khedkar)  यांच्या आईने दमदाटी केल्याचा प्रकार घडला.  (pooja khedkar mother threatened while pune police reach house going to take action against audi car)

ADVERTISEMENT

"माझ्या मुलीने आत्महत्या केली तर सगळ्यांना आतमध्ये टाकीन" अशा प्रकारची धमकी पूजा खेडकर यांच्या आईने यावेळी दिली. इतकचं नाही तर या घटनेचे चित्रिकरण करणाऱ्या माध्यमांच्या कँमेरावर हातात असलेल्या क्लचरने मारण्याचाही प्रयत्न केला होता. ही संपूर्ण घटना मीडियाच्या कॅमेरात कैद झाली आहे. 

हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: ठरलं.. 1500 रुपये 'या' दिवशी जमा होणार तुमच्या बँकेत!

 
पूजा खेडकर यांनी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्या गाडीवर कारवाई करण्यासाठी आज पुणे पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी "माझ्या मुलीने आत्महत्या केली तर सगळ्यांना आतमध्ये टाकीन" अशा प्रकारची धमकी दिली. 

हे ही वाचा : Sharad Pawar : विधानसभेत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? पवारांनी थेट आकडाच सांगितला

आयएएस असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी केल्याप्रकरणी पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या. अशा प्रकारचा दिवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या गाडीवर लावण्यात येऊ नये अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या असतानाही पूजा खेडकरांनी ती गोष्ट केली. तसेच होम डिस्ट्रिक्टमध्ये ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबीन बळकावल्याची घटना घडली. अधिकारात नसताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्याची केबिन बळकावल्याची घटना घडली. अधिकारात नसताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून एक गाडी, शिपायी आणि कार्यालयाची मागणी केली होती. 

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय? 

महाराष्ट्र केडरच्या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या अतिरिक्त मागण्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत. त्यांची पुण्यातून वाशीम येथे बदली करण्यात आली आहे. नवीन अहवालानुसार, पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर करून UPSC ची परीक्षा दिली होती. त्याआधारे विशेष सवलत मिळवून त्या आयएएस झाल्या. त्यांना जर ही सवलत मिळाली नसती तर जितके गुण त्यांना मिळाले आहेत त्यात त्यांना IAS पद मिळणे अशक्य होते. 

दरम्यान निवड झाल्यानंतर पूजा खेडकर यांची वैद्यकीय तपासणी होणार होती. एम्सने त्यांना सहावेळा चाचणीसाठी बोलावले होते. मात्र सहाही वेळा त्या चाचणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. याउलट त्यांनी बाहेरच्या वैद्यकीय एजन्सीकडून एमआरआय अहवाल सादर करणे निवडले, जे UPSC ने स्वीकारण्यास नकार दिला.  त्यानंतर सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ब ट्रिब्युनल म्हणजे कॅट मध्ये पूजा खेडकर यांच्या नियुक्तीला आव्हान दिले होते. 23 फेब्रुवारी 2023 रोजी कॅटने पूजा खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला होता. मात्र त्यानंतरही पूजा खेडकर यांनी सादर केलेले वादग्रस्त प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आणि त्यांची निवड वैध ठरवण्यात आली. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT