Sindhudurg : 'त्या' अमेरिकन महिलेबाबत खळबळजनक माहिती समोर, पोलिसांनाही फुटला घाम

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sindhudurg news american women found chained to a tree shocking revealation in police investigate
या घटनेच्या खोलात गेल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमेरिकन महिलेचा तो बनावच असल्याची दाट शक्यता

point

महिलेने तमिळनाडूचा एका अँड्रेसही दिला होता.

point

त्या अॅड्रेसवर एक दुकान असल्याचे आढळून आले.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील एका जंगलात अमेरिकन महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या घटनेनंतर सिधुदूर्गात एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पथके नेमून या घटनेचा तपास सूरू केला होता. आता या घटनेच्या खोलात गेल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे. (sindhudurg news american women found chained to a tree shocking revealation in police investigate) 

ADVERTISEMENT

गुराख्याच्या माध्यमातून ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेची साखळदंडातून सुटका केली होती. या सुटकेनंतर महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी महिलेने कागदावर लिहून आपला जबाब देत पतीने बांधून ठेवल्याचा आरोप केला होता. तसेच तिचा शारीरीक छळ केल्याचा आरोप देखील केला होता. 

हे ही वाचा : Harshvardhan Patil : ''महायुतीत मला टार्गेट केलं जातंय'', हर्षवर्धन पाटलांचा नेमका रोख कुणावर?

महिलेच्या प्राथमिक जबाबानुसार पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला, परंतु, आठवडाभराच्या तपासात 'त्या' महिलेने दिलेल्या पत्त्यावर तिने नवरा म्हणून ज्या व्यक्तीचे नाव दिले, त्या नावाच्या व्यक्तीचे अस्तित्व कुठेच आढळून आले नाही. त्यामुळे या अमेरिकन महिलेचा तो बनावच असल्याची दाट शक्यता आता वाटू लागली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महिलेने तमिळनाडूचा एका अँड्रेसही दिला होता. त्या अॅड्रेसवर निवासस्थान नसून एक दुकान असल्याचे आढळून आले.  इतकचं  नाही तर काही महिन्यांपूर्वी तिच्यावर गोव्यातील बांबोळी येथील इस्पितळात तसेच अन्य काही इस्पितळांमध्ये मानसिक उपचार झाल्याचे देखील उघडकीस आले.

विशेष म्हणजे सदर महिलेजवळील मोबाईल व टॅबवर आढळलेल्या माहितीनुसार त्या महिलेचा मुंबई आणि गोवा येथील आतापर्यंत जो वावर आढळून आला, तिथे ती एकटीच आढळून आली आहे. त्यामुळे ती ज्या स्थितीत जंगलात आढळून आली आणि तिने जो जबाब दिला, तो बनाव असल्याची शक्यता अधिक वाटत आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Paris Olympic 2024 : 46 सेकंदात प्रतिस्पर्ध्यांला गारं केलं, नंतर महिला बॉक्सरवर पुरूष असल्याचा आरोप; नेमका वाद काय?

दरम्यान वरील सर्व शक्यता वाटत असल्या तरी सिंधुदुर्ग पोलिसांनी मात्र याबाबत ठोस अस काहीही स्पष्ट केलेलं नाही.या महिलेला आता अधिक उपचाराकरिता रत्नागिरी येथील शासकीय मनोरुग्णालयात उपचाराकरता पाठविण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT