Baba Ramdev : “…तर आम्ही एक कोटींचा दंड ठोठावू”, सुप्रीम कोर्ट संतापले, पतंजलीला झापले
Supreme court Patanjali case : इंडियन मेडिकल असोसिएशनने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने पतंजली कंपनीला चांगलेच झापले.
ADVERTISEMENT

Supreme Court Patanjali Case : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चांगलेच फटकारले. अॅलोपॅथीच्या औषधांबाबत पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. यावर कोर्टाने पंतजलीची कानउघाडणी करत सज्जड दम दिला. (Supreme court warns to Baba Ramdev’s Patanjali company)
न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने पतंजलीला इशारा दिला की, त्यांच्या उत्पादनांबाबत अशाच दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या गेल्या, तर एक कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो.
हेही वाचा >> लिव्ह इन पार्टनरचा सुटकेसमध्ये मृतदेह, दीड तास फिरला नंतर…; कुर्ल्यातील तरुणीच्या हत्येचं गूढ उलगडलं
न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला भविष्यात अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश दिले आहेत. पतंजलीने प्रेसमध्ये अशी विधाने करण्यापासून अंतर स्वतःला दूर ठेवले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
अॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा वाद होऊ देऊ नका
सुप्रीम कोर्टाने प्रकरणावरील सुनावणी वेळी निर्देश दिले की पतंजली आयुर्वेद भविष्यात अशी कोणतीही जाहिरात प्रकाशित करणार नाही किंवा त्यांच्याकडून प्रेसमध्ये अशी आकस्मिक विधाने केली नाहीत याची देखील काळजी घेतील. यासोबतच हा मुद्दा अॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद असा वाद होऊ नये, अशा सूचना कोर्टाने पंतजलीला दिल्या.










