Gayatri Joshi: ‘स्वदेश’ फेम अभिनेत्री अडचणीत, पतीला होऊ शकतो 7 वर्ष तुरूंगवास!
शाहरुख खानच्या स्वदेश या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी सध्या चर्चेत आहे. त्याचं कारणही खूप गंभीर आहे. तिचा इटलीत मोठा अपघात झाला. या अपघाताच्या बातमीने खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
Swadesh Actress Gayatri Joshi’S Car Accident: शाहरुख खानच्या स्वदेश या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी सध्या चर्चेत आहे. त्याचं कारणही खूप गंभीर आहे. तिचा इटलीत मोठा अपघात झाला. या अपघाताच्या बातमीने खळबळ उडाली. त्याचवेळी, आता या प्रकरणात आणखी एक मोठे अपडेट आले आहे, ज्यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. (Swadesh Actress Gayatri Joshi’S Car Accident her Husband likely to be jailed for 7 years)
ADVERTISEMENT
विकास ओबेरॉयच्या विरोधात चौकशी सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, कार अपघातावेळी गायत्री जोशीचा अब्जाधीश पती विकास ओबेरॉय हा सोबत होता. आता पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तपास सुरू केला आहे. गायत्री जोशी आणि विकास ओबेरॉय यांच्यासोबत अन्य काही वाहनांचा रस्ता अपघातात समावेश होता. या अपघातातून अभिनेत्री आणि तिचा नवरा बचावला, पण एका स्विस जोडप्याचा मृत्यू झाला. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, त्यात गायत्री जोशी यांच्या पतीच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
“त्या मस्तवाल खासदाराने…”, उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
गायत्रीच्या अब्जाधीश पतीला तुरुंगवास होण्याची शक्यता!
अपघाताची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विकास ओबेरॉयची चौकशी केली. आता या अपघातात तो दोषी आढळल्यास त्याला सात वर्ष तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
icc world cup 2023: भारतीय संघासाठी मोठा धक्का! शुभमन गिलच्या खेळण्यावरच प्रश्नचिन्ह
लॅम्बोर्गिनीचे छत उडाले
विकास ओबेरॉय निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी हुराकन चालवत होता. अपघातात दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी तो संशयितांच्या यादीत आहे. माहितीनुसार, विकास आणि गायत्रीच्या लॅम्बोर्गिनीचे छत उडाले होते, मात्र दोघेही सुरक्षित आहेत.
‘तुम्हाला पळ काढता येणार नाही’, मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला झापलं
अपघाताचा व्हायरल Video
नुकताच एका रस्ते अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो गायत्री जोशी यांचा अपघात असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओमध्ये, लॅम्बोर्गिनी आणि फेरारी या दोन आलिशान कार एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना एकमेकांना धडकताना दिसत आहेत. एका कॅम्पर व्हॅनचाही अपघात झाला. या अपघातात स्वित्झर्लंडमधील मार्कस क्रौटली आणि मेलिसा क्रौटली या कपलचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT