महाराष्ट्र आजचा हवामान: दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ! वाचा आजचं हवामान

मुंबई तक

आसपासच्या हवामानाचा अंदाज: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बदलत्या हवामानाचे वारे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Today (फोटो- AI)
Maharashtra Weather Today (फोटो- AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या जिल्ह्यात असेल कोरडं हवामान?

point

या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी

point

राज्यातील हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बदलत्या हवामानाचे वारे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

तसच मुंबई शहर आणि उपनगरांसाठी आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 25°C असण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. दरम्यान, आज सोमवारी 14 एप्रिलला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कशाप्रकारचं हवामान असणार आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

हे ही वाचा >> पुण्यातील एकाला 2.5 कोटींचा गंडा; कनेक्शन थेट बीड, पाकिस्तान, दुबई नेपाळपर्यंत... प्रकरण काय?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील  जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४°C आणि २४°C च्या आसपास असेल.


पालघर, ठाणे, मुंबई,रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीडमध्ये कोरडं हवामान असणार आहे. तर सिंधुदुर्ग, हिंगोलीत वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. तर अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिममध्ये हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नाही. 
 

तसच रविवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसरात कोरडं हवामानाचा अंदाज हवामान विभागाकडून बांधण्यात आला होता. तर  जळगाव, अहिल्यानगर, सांगली, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

हे ही वाचा >> "100 किलोचा माणूस टॉवेलने कसा फास घेऊ शकतो" आरोपी विशाल गवळीच्या कुटुंबाला घटनेवर संशय

हे वाचलं का?

    follow whatsapp