Ganesh Chaturthi 2024: बाप्पा मोरया..  गणपती बाप्पाच्या पुजेचा 'हा' आहे मुहूर्त!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणेश चतुर्थी 2024 च्या पुजेचा मुहूर्त कधी?

point

गणेश चतुर्थीचा सण किती दिवस साजरा करता येतो?

point

2024 मध्ये अनंत चतुर्दशी कधी आहे?

Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थी हा सण गणरायाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. धार्मिक शास्त्रानुसार, भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला होता. गणेश चतुर्थीपासून सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला संपतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात बाप्पाला घरी आणतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचे विसर्जन करतात. 2024 मध्ये गणेश चतुर्थीचा हा मुहूर्त कधी आहे? आणि पूजा, विधी याबाबत सर्वकाही आपण या बातमीतून सविस्तर जाणून घेऊयात. (when is ganesh chaturthi in the year 2024 know the date time muhurta)

ADVERTISEMENT

गणेश चतुर्थी 2024 च्या पुजेचा मुहूर्त कधी?

2024 मध्ये गणेश चतुर्थी 06 सप्टेंबर रोजी दुपारी 03 वाजून 01 मिनिटांनी सुरू होईल आणि 07 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 05 वाजून 37 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथी वैध असल्यामुळे गणेश चतुर्थी 07 सप्टेंबर 2024 रोजी शनिवारी साजरी केली जाईल. 

हेही  वाचा : Ganesh Chaturthi 2024: यंदा कधी आहे गणेश चतुर्थी? जाणून घ्या तिथी, पूजेचा मुहूर्त

गणेश चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त 11 वाजून 3 मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी 01 वाजून 34 मिनिटांनी संपेल. पूजेसाठी एकूण कालावधी 02 तास 31 मिनिटे आहे.

हे वाचलं का?

गणेश चतुर्थीचा सण किती दिवस साजरा करता येतो?

गणेश चतुर्थी 1.5, 3, 5, 7, 10 किंवा 11 दिवस साजरी करू शकता. या कालावधीनंतर गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. 11 दिवसांनी बहुतेक गणपती विसर्जित केले जातात. त्या दिवसाला अनंत चतुर्थी असं म्हणतात.

हेही  वाचा : Raj Thackeray : "शरद पवारांनी या गोष्टीला हातभार लावू नये", ठाकरेंचा टोला

2024 मध्ये अनंत चतुर्दशी कधी आहे?

2024 मध्ये, अनंत चतुर्दशी सोमवार, 16 सप्टेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लोक बाप्पाला निरोप देतात. 

ADVERTISEMENT

गणेश चतुर्थी शुभ योग

यावर्षी गणेश चतुर्थीला दुर्मिळ ब्रह्म आणि इंद्र योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. ब्रह्मयोग रात्री 11.17 पर्यंत आहे. यानंतर इंद्र योग तयार होत आहे. या दिवशी भाद्रवशीचाही योगायोग आहे. गणेश चतुर्थीला भाद्र पाताळात राहील. याशिवाय गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोगही तयार होत आहेत. एकूणच गणेश चतुर्थीला अनेक दुर्मिळ आणि शुभ घटना घडत असतात.

ADVERTISEMENT

हेही  वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे का, कुठे पाहता येणार यादी?


येत्या पाच वर्षांतील गणेश चतुर्थीच्या तारखा...

  • 2025 - बुधवार, 27 ऑगस्ट
  • 2026 - सोमवार, 14 सप्टेंबर
  • 2027 - शनिवार, 4 सप्टेंबर
  • 2028 - बुधवार, 23 ऑगस्ट
  • 2029 - मंगळवार, 11 सप्टेंबर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT