Toilet मुळे घटस्फोटपर्यंत प्रकरण, दोन वर्ष सासरीच गेला नाही जावई!
लग्नानंतर कधी काय होईल हे सांगता येत नाही, एका जावयाच्याही आयुष्यात असंच काही तरी घडलं आहे. सासरीवाडीला शौचालय नव्हतं, त्यामुळे त्याने शौैचालय बांधून घ्या असं सांगूनही दोन वर्षे बांधलं नाही म्हणून थेट त्याने आता टोकाचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
UP News: नालंदा जिल्ह्यातील तेलमरमध्ये टॉयलेट एक प्रेमकथा (Toilet ek Premkatha) या चित्रपटासारखी घटना घडली आहे. तेलसर सासरवाडी असलेल्या एका जावयाचा सासरवाडीच्या लोकांना विचित्रच अनुभव आला आहे. बायकोच्या घरी शौचालयाची व्यवस्था नव्हती, त्यामुळे तो सलग दोन वर्षे सासरवाडीला गेलाच नाही. त्यामुळे हे प्रकरण आता अगदी घटस्फोटापर्यंत गेलं आहे. घरात शौचालय नसल्यामुळे नवऱ्याने आता बायकोसमोर घटस्फोटाचा (Divorce) पर्याय दिला आहे. त्यामुळे रागात असलेल्या सासरच्या लोकांनी आता ज्यांनी लग्न लावून दिले होते, त्या मध्यस्थीकडेच तक्रार केली आहे.
ADVERTISEMENT
घरी शौचालय बांधून घ्या
घटस्फोटाचा हा वाद लग्न ठरवणाऱ्या त्या मध्यस्थीकडे गेल्यानंतर त्याने मुलीच्या घरातील लोकांना मारहाण केली आहे. त्यामुळे ऋषी नावाची व्यक्ती गंभीर जखमी जाली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती देताना मुलीची आई सरगुन देवी यांनी सांगितले की, आमच्या मुलीचं दोन वर्षापूर्वी पाटणामध्ये राहणाऱ्या विक्कीबरोबर लग्न लावून दिलं होतं, त्याचवेळी विक्की यांनी त्यांना घरात शौचालय बनवून घ्या असं सांगितलं होतं.
हे ही वाचा >> Mamata Banerjee : ‘INDIA’ आघाडी फुटली! ममता बॅनर्जींनी सोडली साथ
टॉयलेटमुळे आला दुरावा
जावयाने सासरवाडीमध्ये शौचालय बांधून घ्या असं सांगितल्यानंतर सासऱ्यानेही हो म्हणून सांगितले. मात्र त्यांच्या लग्नानंतरही शौचालय बांधण्यात आलं नाही. त्यामुळे जावयानेही दोन वर्षात सासरवाडी जाणं टाळलं. आपल्या माहेरी नवरा येत नाही याचा राग त्याच्या बायकोला आला आणि त्यांच्यातील वाद वाढत गेले व त्यांच्यामध्येही दुरावा निर्माण होत गेला.
हे वाचलं का?
तरच मुलीचा संसार
शौचालय नसल्यामुळे नवरा बायकोचे वाद वाढत गेल्यानंतर आता विक्कीच्या सासूने सांगितले की, शौचालय कसं बांधणार कारण शौचालय बांधण्यासाठी आमच्याकडे पैसाच नाही, आणि आम्हाला सरकारी योजनाही मिळाल्या नाहीत, त्यात जावई ही गोष्ट स्वीकारायला तयार नाही. तो म्हणतो की, आधी घरात शौचालय तयार करून घ्या, नंतरच मुलीचा संसार होणार, नाही तर मी तुमच्या मुलीला घटस्फोट देणारच आहे. मात्र हा वाद लग्न जुळवून आणणाऱ्या व्यक्तीपर्यंत गेला त्यावेळी त्यांनी थेट मुलीच्या घरातील लोकांना मारहाण केली, आणि हा वाद वाढतच गेला.
हे ही वाचा >> Rohit Pawar ईडीसमोर हजर, सुप्रिया सुळे प्रचंड चिडल्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT