नवऱ्याला वठणीवर आणण्यासाठी बायकोने सुरू केली दारू?, पतीने जोडले हात!
Viral News: दारुड्या नवऱ्याकडून दररोज होणारा त्रास कमी करण्यासाठी एका महिलेने एक नामी शक्कल वापरली. ज्यामुळे पतीची दारूची सवय सुटली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
ADVERTISEMENT
Viral News: आग्रा: आतापर्यंत आपण अनेकदा ऐकलं आहे की, नवरा मद्यधुंद अवस्थेत आपल्या पत्नीला किंवा कुटुंबाला त्रास देतो.. पण आज आम्ही तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत, ती तुम्ही याआधी ऐकली किंवा पाहिली नसेल. दारूवरून पती-पत्नीमधील वाद हा नेमकं कोणतं टोक गाठू शकतं याचा विचार देखील तुम्ही केला नसेल. हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा येथील आहे. जिथे एक पती हा रोज दारु पिऊन आपल्या पत्नीला बेदम मारहाण करायचा. त्याच्या याच दारू पिण्याच्या सवयीला कंटाळून अखेर पत्नीने एक असं पाऊल उचललं की, ज्यामुळे पतीचीही भंबेरी उडाली आणि चक्क पत्नीसमोर पतीला हात जोडावे लागले. (to get rid of alcohol addiction the wife herself became an alcoholic know what is the actual matter)
ADVERTISEMENT
वास्तविक हे संपूर्ण प्रकरण आग्राच्या फॅमिली काउन्सिलिंग सेंटरमधून समोर आले आहे. येथे पती-पत्नी हे समुपदेशनासाठी आले होते. येथे पती-पत्नीने एकमेकांवर दारूच्या आहारी गेल्याचा आरोप करत होते. आधी नवऱ्याने माहिती देताना सांगितलं की, त्याची पत्नी खूप दारू पिते.
दारू पिऊन पत्नी मला बेइज्जत करते- नवरा
मिळालेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीवर आरोप केला की, ती दारू पिऊन त्याला बेइज्जत करते. तसंच ती खूप गोंधळही घालते. पतीने पुरावा म्हणून काही व्हिडिओ देखील सादर केले. व्हिडिओमध्ये पती पत्नीच्या भीतीने दूर पळून जाताना आणि हात जोडून माफी मागताना दिसत आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> पत्नीला वाटलं नवऱ्याला दुसरीही बायको, पर्दाफाश करायला गेली अन्…
पत्नीने सांगितली तिची शोकांतिका
नवऱ्याचे बोलणे संपल्यानंतर पत्नीने आपले म्हणणे मांडले. पत्नीने पतीवर आरोप केला आहे की, पूर्वी तिचा पती रोज दारू पिऊन घरी यायचा. तिला मारण्यासाठी तो रोज नवनवीन बहाणे शोधायचा आणि तिला खूप मारायचा. पत्नीच्या म्हणण्यानुसार, ही पतीची रोजची सवय बनली होती. पतीची ही सवय सुटावी त्याचे दारूच्या व्यसन दूर व्हावे आणि पतीच्या मारहाणीपासून आपला बचाव व्हावा यासाठी पत्नीने देखील थेट दारू पिऊन धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. जेव्हा पत्नीने ही गोष्ट सांगितली तेव्हा समुपदेशक सेंटरमधील लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
ADVERTISEMENT
बायको खरंच दारू पिऊ लागलेली?
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने सांगितले की, पतीच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी तिने आपण दारू पितो असं भासवण्यास सुरुवात केली. खरं तर नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी तिने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली होती. पत्नी म्हणते की ती दारू पीत नाही. ती फक्त नशेत असण्याचं नाटक करत होती. पतीचं दारुचं व्यसन सुटावं यासाठी ती स्वत: नशेत असल्यासारखं वागायची.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘खुशीला मारलं, आता तिच्याजवळ जातोय’, त्याने फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच…
दोघांमध्ये काय ठरलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीचे म्हणणे ऐकून समुपदेशकाने दोघांमध्ये लेखी करार करून घेतला. पतीला दारूची सवय सोडण्याची सूचना करण्यात आली आहे. यानंतर पतीने आठवड्यातून एकदाच दारू पिणार आणि पत्नीशी कधीही भांडण करणार नाही, असे लेखी हमीपत्र दिले आहे. या लेखी करारानंतर पती-पत्नी हे एकत्र घरी गेले. सध्या पती-पत्नीमधील हे प्रकरण संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT