Twitter Blue Tick :शाहरूख सलमानसह विराट राहुल गांधींची ब्ल्यू टिक हटवली, काय आहे कारण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

twitter blue tick removed from legacy verified account
twitter blue tick removed from legacy verified account
social share
google news

Twitter Removes Legacy Blue Tick : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कची (elon musk) मालकी असलेल्या ट्विटरने देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तीच्या अकाऊंटवर असलेली ब्ल्यू टिक (Blue Tick) काढून टाकली आहे. या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान, बॉलिवूडचा खान भाईजान सलमान खान, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश होतो. दरम्यान या प्रसिद्ध व्यक्तीच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्ल्यू टिक का हटवण्यात आली आहे, हे जाणून घेऊयात.(twitter blue tick removed from legacy verified account elon musk)

ADVERTISEMENT

का ब्लू टिक काढली?

ट्विटरचे मालक एलॉन मस्कने (elon musk) 12 एप्रिलला ब्ल्यू टिक (Blue Tick) हटवण्या संदर्भातली घोषणा केली होती. त्यानुसार गुरूवारी 20 एप्रिलपासून सर्व लिगेसी वेरीफाईड़ अकाऊंटचे ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहेत. ट्विटरची पेड सर्विस घेतल्याविना ज्यांना ब्ल्यू टीक मिळाली होती त्या अकाऊंटचे ब्ल्यू टीक हटवण्यात आली आहे

हे ही वाचा >> तुमचीही Twitter वरील Blue Tick गेली? अशी आहे प्रक्रिया

जूनी पॉलिसी काय?

ट्विटर याआधी राजकीय नेते, अभिनेते, पत्रकारांसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींना अकाऊंटवर ब्ल्यू टिक (Blue Tick) द्यायचे.या ब्ल्यू टिकसाठी याआधी कोणतेही चार्ज आकारले जायचे नाही. पण आता एलॉन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता ज्या अकाऊंटसनी ट्विटरची पेड सर्विस घेतली नाही आहे, त्यांचे ब्ल्यू टिक हटवण्यात आले आहे.

हे वाचलं का?

आता कसे मिळणार ब्लू टिक?

खरं तर ट्विटरने पेड ब्ल्यू टिक सर्विस (Blue Tick) सुरु केली आहे. या सर्विसची सुरुवात सर्वात आधी अमेरीका, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात आली होती.आता हिच सर्विस भारतात देखील सुरु झाली आहे. या नवीन सर्विसनुसार या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या खात्यावर ब्ल्यू टिक्स मिळणार आहे.

हे ही वाचा >> दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच महिलेवर झाडल्या गोळ्या

जर एखाद्या व्यक्तीला ब्ल्यू टिक (Blue Tick) हवी असले अथवा त्याला त्याची ब्ल्यू टिक कायम ठेवायची असल्यास, ट्विटर ब्ल्यू टिकचं सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. भारतात ट्विटरचे सब्सक्रिप्शन 650 रूपयांपासून सुरु होते. मोबाईल युझर्सना ब्ल्यू टिकसाठी प्रती महिना 900 रूपये भरावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान ट्विटर खरेदीसाठी एलॉन मस्कचा (elon musk) खुप पैसा लागला आहे. त्यामुळे हा पैसा परत मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ट्विटर ब्ल्यू (Blue Tick) सबस्क्रिप्शन नंतरही मस्क थांबणार नाही आहेत. यापुढे असे अनेक निर्णय घेत राहणार आहेत, जेणेकरून ट्विटरवरून पैसा कमवता येईल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT