Twitter Blue Tick Price : तुमचीही Twitter वरील Blue Tick गेली? अशी आहे प्रक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

how to get back blue subscription price and more twitter
how to get back blue subscription price and more twitter
social share
google news

Twitter Blue Tick Price : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटर खरेदी केल्यानंतर अनेक बदल केले होते. ट्विटरच्या नियमावलीसह, लोगोमध्ये बदल केला होता.या बदलानंतर ट्विटरने आता ब्ल्यू टिकच्या (Blue Tick) नियमातही बदल केला आहे. ज्या प्रसिद्ध व्यक्तींनी ब्ल्यू टिकचे सब्सस्क्रिप्शन घेतले नव्हते, त्यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. या ब्ल्यू टिक हटवण्यामध्ये देशातील प्रसिद्ध अभिनेते, राजकिय नेते, खेळाडू आणि पत्रकारांचा समावेश आहे. आता ही ब्ल्यू टिक हटवल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे? ब्ल्यू टिकचे सब्सस्क्रिप्शन कितीला मिळणार आहे? हे जाणून घेऊयात. (twitter blue tick removed how to get back blue subscription price and more)

ADVERTISEMENT

सर्व युझरचे वेरिफिकेशन बॅज हटवलेत का?

सर्वच युझरचे वेरिफिकेशन बॅज हटवलेत आहेत का? तर तसे नाही आहे. ट्विटरने याआधीच काही बदल केले होते. त्यातील पहिले वेरिफिकेशन बॅज वेगळे होते. त्याअंतर्गत कंपन्यांना यल्लो बॅज, सरकार आणि एजन्सींना ग्रे बॅज देण्यात आला होता. तर व्यक्तींना निळ्या रंगाची टिक मिळाली होती. आता ट्विटरने सर्व लिगेसी खात्यांमधून ब्ल्यू टिक काढून टाकली.

हे ही वाचा >> शाहरूख सलमानसह विराट राहुल गांधींची ब्ल्यू टिक हटवली, काय आहे कारण?

ब्ल्यू टिक का हटवलं?

ट्विटरला अनेक वर्षापासून नुकसानीचा सामना करत होते. त्यामुळे एलॉन मस्कने जेव्हा ट्विटर खरेदी केली तेव्हा त्यामधून नफा कमावण्याचा निर्णय़ घेतला. यातील एक पर्याय म्हणजे ब्ल्यू टिक सब्सस्क्रिप्शन प्लान लॉंच करने होता. एलॉन मस्कने ब्ल्यू टिकला (Blue Tick) लिगेसी अकाऊंटवरून हटवत सब्सस्क्रिप्शनशी जोडण्याचा निर्णय़ घेतला. जेणेकरून कंपनी चांगली कमाई करेल. त्यामुळे ब्ल्यू टिक सर्व अकाऊंटमधून काढून टाकलं.

हे वाचलं का?

ब्लू टिक कोणाला मिळणार?

आता प्रश्न असा आहे की, ब्ल्यू टिक (Blue Tick) परत मिळणार का? युझर्सना ब्ल्यू टिक मिळणार आहे, पण ते पहिल्यासारखे नसणार आहे. ब्ल्यू टिकसाठी तुम्हाला ट्विटर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागणार आहे. विशेष म्हणजे आता कोणालाही ब्ल्यू टिक घेता येणार नाही आहे.

हे ही वाचा >>  दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच महिलेवर झाडल्या गोळ्या

कसं मिळणार ब्लू टिक?

जर तुम्हाला ब्ल्यू टिक (Blue Tick) मिळवायची असेल तर तु्म्हाला ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागणार आहे. कंपनीने खुप आधीच सब्सक्रिप्शन प्लान लॉंच केला होता.

ADVERTISEMENT

प्रत्येक महिन्याला किती पैसे लागणार?

ट्विटरवर तुम्हाला ब्ल्यू सब्सक्रिप्शनचा (Blue Tick) पर्याय दिसणार आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्ल्यू टिक खरेदी करता येणार आहे. ट्विटरवर ब्ल्यू टिकसाठी तुम्हाला महिन्याला 650 रूपये भरावे लागणार आहेत. तर वर्षासाठी तु्म्हाला 6 हजार 800 रूपये भरावे लागतील.ही किंमत वेब वर्जनसाठी आहे. मोबाईल वर्जनसाठी तुम्हाला महिन्याला 900 तर वर्षभरासाठी 9400 रूपयाचा प्लान खरेदी करावा लागणार आहे.

ADVERTISEMENT

किती टॅग आहेत?

ब्ल्यू सब्सस्क्रिप्शन अंतर्गत फक्त ब्ल्यू टॅग मिळतो. असे पाहायला गेले तर या प्लॅटफॉर्मवर तीन टॅग आहेत. ज्यामध्ये येलो, ब्ल्यू आणि ग्रे टॅगचा समावेश आहे. यासह कंपनी विशेष अकाऊंटसाठी इतर काही माहिती देखील जोडत आहे.

कोणाला काय टॅग मिळणार?

एलॉन मस्कने तीन प्रकारचे टॅग लॉंच केले आहेत.यामध्ये कंपन्यांसाठी यलो बॅज, सरकारी एजेन्सी, सरकारी ऑफिस आणि दुसऱ्या अकाऊंट्सना ग्रे बॅज दिला आहे. शेवटी ब्ल्यू टिक वैयक्तिक युझर्सना दिला आहे.

हे ही वाचा >>  खारघर दुर्घटना: महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी अद्यापही मीडियासमोर आपली बाजू का नाही मांडली?

मोबाईल-वेबसाठी वेगवेगळे सब्सस्क्रिप्शन?

ट्विटरचं ब्ल्यूचे सब्सस्क्रिप्शन मोबाईल आणि वेबसाठी वेगवेगळी आहे. वेब वर्जनच्या ब्ल्यू टिकची सुरुवात 600 रूपयाच्या महिन्याच्या सब्सस्क्रिप्शन पासून होईल. आणि मोबाईल वर्जनसाठी 900 रूपये महिन्याचा प्लान आहे.

लिगेसी अकाऊंटच काय होणार?

जर तुम्ही लिगेसी अकाऊंट होल्डर आहात तर, तुम्ही पहिल्यासारखेच अकाऊंट वापरू शकता. यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही आहे. पण तुमच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे.

Twitter Blue चे फायदे काय?

ट्विटर ब्लूचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही याचे सब्सस्क्रिप्शन घेत असाल तर कंपनी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत प्राधान्यक्रम देईल. यासोबत तुम्हाला ब्ल्यू टिक देखील मिळणार आहे. तसेच तुम्हाला ट्विट्स बोल्ड आणि इटालिक फॉन्ट अॅड करण्याचा पर्याय मिळेल. तसेच ट्विटरवर 1080P चा व्हिडिओ देखील पोस्ट करता येणार आहे. यासोबत तुम्हाला तुमचे ट्विट एडिट करणे, मोठे ट्विटस् लिहणे आणि NFTसारखे फिचर्स मिळणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT