Manoj Jarange : गाडी अडवताच जरांगे रडले! म्हणाले, '...नाहीतर मरून माघारी येणार'

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj jarange patil cry : मनोज जरांगे पाटील फडणवीसांवर आरोप करत मुंबईकडे निघाले. मात्र लोकांनी त्यांची गाडी अडवताच ते रडले.

social share
google news

Manoj Jarange patil News : (इसरार चिश्ती, अंतरवाली सराटी) मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन हाती घेतलं आहे. २५ फेब्रुवारी रोजी या आंदोलनाने अचानक वेगळं वळण घेतलं. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच तुझ्या दारात येतोय घे माझा बळी म्हणत इशारा जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले. मात्र, त्यांची गाडी समर्थक आंदोलकांनी आडवली. त्यानंतर जरांगे यांना रडू कोसळले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी उभारलेल्या व्यासपीठावरून उठून खाली आले. त्यानंतर गाडीत बसले. मात्र, लोकांनी त्यांची गाडी अडवली. त्यांना दवाखान्यात चला म्हणून हट्ट केला. इतकंच नाही तर लोकांनी जरांगे यांच्या गाडीसमोर ठिय्याच दिला. हे सगळं बघून जरांगे पाटील रडायला लागले. 

जरांगे फडणवीसांबद्दल काय बोलले?

मनोज जरांगे गाडीत बसल्यानंतर म्हणाले, "देवेंद्र फडणवीसला जीव माझा जीव घ्यायचा आहे. मी मराठ्यामधला काटा आहे. मी जातो, त्याला माझा जीव घ्यायचा आहे. छगन भुजबळ आणि मराठा नेते त्याने माझ्याविरोधात घातले आहेत."

हे वाचलं का?

हेही वाचा >> फडणवीसांवर स्फोटक आरोप; जरांगे मुंबईकडे निघताच राडा, बघा व्हिडीओ

"त्याला (देवेंद्र फडणवीस) माझा पोलिसांच्या हाताने जीव घ्यायचा आहे. त्यापेक्षा मी त्याच्याच दारात जातो, त्याला म्हणावं पोलिसाला गाडी आडव. मला गोळ्या घाल. पण, मी ओबीसीतून आरक्षण घेणार. मी सगेसोयरेचा गुलाल घेऊन येणार नाहीतर मरून माघारी येणार", असा निर्धार जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.  

घे म्हणावं जीव, जरांगेंचं फडणवीसांना चॅलेंज

जरांगे पाटील म्हणाले, "तो म्हणतो याने (मनोज जरांगे) मराठे एक केले. हा आपलं ऐकत नाही. दहा टक्के आरक्षण घेत नाही. निवडून यायचं असेल, तर याला मारावं लागेल. मराठ्यांना विनंती आहे की माझी गाडी नका आडवू. माझ्या गाडीसमोर नका झोपू. माझी गाडी जाऊद्या." 

"डायरेक्ट त्याच्या दारात जाणार. देवेंद्र फडणवीसला माझा बळी घ्यायचाय, घे. मी मराठ्यांची एकजूट नाही तुटू देणार. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार. पोलिसांच्या हाताने जीव घ्यायचाय ना माझा. घे म्हणावं जीव. मराठ्यानो एकजूट ठेवा. तुमच्या लेकरांसाठी आरक्षण घेऊन येतो", असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. 

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'देवेंद्र फडणवीसांना माझं एन्काऊंटर करायचंय', जरांगेंचा गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

"तो मला मारणार आहे. पोलिसांच्या हाताने गोळ्या घालून किंवा मला औषध देणार होता डॉक्टरांच्या हाताने. तो म्हणतोय की हा फूटत नाहीये. याला मारून टाका. नाहीतर पोलिसांच्या हाताने एन्काऊंटर करा याचं. देवेंद्र फडणवीस जीव घ्यायचाय ना. बामणी कावा करतोय मराठ्यांविरोधात. तुझ्या दारात येतोय घे माझा बळी", अशा संतप्त भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT