Mumbai Local train : मध्य रेल्वेची लागली वाट, लोकल ट्रेनचा डबा घसरला अन्...

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbai Local train Accident: कल्याण रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनचा बारावा डबा घसरल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ज्यामुळ अनेक प्रवाशांचे हाल झाले आहेत.

social share
google news

Mumbai Local train: कल्याण: टिटवाळा हून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनचा बारावा डबा रुळावरून घसरल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकाजवळ घडली. हा अपघात आज (18 ऑक्टोबर) रात्री नऊच्या सुमारास फलाट क्रमांक 2 च्या रुळावर झाला. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले असून, या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. (mumbai local train accident on central railway 12th local coach derailed near kalyan station)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

कल्याण रेल्वे स्थानकाजवळ नेमकं काय घडलं?

टिटवाळा स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे जाणारी 8.35 वाजता सुटलेली लोकल 8.55 वाजता कल्याण स्थानकाजवळ थांबली. गाडीचा वेग कमी असल्याने चालकाने तातडीने गाडी थांबवली, ज्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी टळली.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! फॉर्म भरलाय पण पैसेच आले नाहीत? ही आहेत कारणं...

यामुळे कल्याण स्थानकातून टिटवाळ्याकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या थांबवून त्या दुसऱ्या ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. पण यामुळे, मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान, मध्य रेल्वेवरील वाहतूक ही 10 वाजून 30 मिनटांनी सुरळीत झाली. पण अनेक लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाड्या या सध्या उशिराने धावत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT