सुप्रसिद्ध संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टींना कोल्हापुरात भर रस्त्यात चपलेने मारहाण, काय घडलं?
आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी विश्वस्त मंडळातील दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे.
ADVERTISEMENT
दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर
ADVERTISEMENT
Sant Balumama: कोल्हापूर: राज्यभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हातील राधानगरी तालुका आदमापूर (Adamapur) इथल्या संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचा (Sant Balumama Devasthan Trust) गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एवढंच नव्हे तर या ट्रस्टच्या कार्याध्यक्षांच्या समर्थकांनी अदमापूर गावचे सरपंच आणि काही विश्वस्तांना भर रस्त्यात चपलेने मारहाण केल्याची खळबळजनक घटना कोल्हापुरात (Kolhapur) घडली आहे. यावेळी कोल्हापूर शहरात फ्री स्टाईल हाणामारीच पाहायला मिळाली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैदही झाला आहे. (well known saint balumama devasthan trustees beaten with shoes in street in kolhapur what is actual issue)
आदमापूरचे सरपंच विजय गुरव हे चुकीच्या पद्धतीने ट्रस्टींची नेमणूक आणि गैरकारभार संदर्भात वकिलांची भेट घ्यायला कोल्हापुरातील प्रतिभानगर इथे आले होते. त्याचवेळी देवस्थान ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले त्यांचे समर्थक आणि सरपंच विजय गुरव यांच्यामध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली.
हे वाचलं का?
नेमकं प्रकरण काय?
अदमापूर गावचे सरपंच विजय गुरव यांना भररस्त्यात मारहाण करण्यात आली. त्यानंतर मुंबई Tak शी बोलताना विजय गुरव यांनी आपली बाजू मांडली.\
ही बातमीही वाचा- Odisha: आई शप्पथ! अंपायरने ‘नो बॉल’ देताच चाकूने भोकसले; मैदानावर थरार
ते म्हणाले की, ‘आदमापूर इथल्या बाळूमामा ट्रस्टमध्ये कार्याध्यक्ष पद रिक्त झाल्यानंतर त्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. 11 सदस्य एका बाजूला आणि ज्यांना कार्याध्यक्ष पद हवं आहे अशा लोकांमध्ये वाद झाला.
बाळूमामा संस्थेचा मी विश्वस्त आहे. तसंच मी आदमापूर गावचा सरपंच देखील आहे. या देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मुगदूम यांचे एक महिन्यापूर्वी दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर उर्वरित 12 पैकी 11 विश्वस्तांनी मिळून कार्याध्यक्ष निवडीसाठी वकिलाच्या कार्यालयात आले होते.’
ADVERTISEMENT
‘मात्र, या ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी आपण स्वत: कार्याध्यक्ष झालेलो आहोत अशा स्वरुपाच्या नोटीस पाठवल्या. त्याचसाठी आम्ही आलेलो असताना त्यांनी पाठलाग करून त्यांच्या गुंडांकरवी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. मला कार्याध्यक्ष होऊ देत नाही का.. तू आता ठारच मारतो.. अशी धमकी त्यांनी मला यावेळी दिली.’
ADVERTISEMENT
ही बातमीही वाचा- इमारतीवरून पडलेली सळई तरूणाच्या शरीराच्या गेली आरपार
‘मी पोलिसांना तात्काळ याबाबत कळवलं असून आता राजारामपुरी पोलीस स्टेशनला जात असून तिथे मी जीवे मारण्याची तक्रार नोंदवणार आहे.’ असे आरोप विजय गुरव यांनी केला आहे.
धैर्यशील भोसले यांच्या समर्थकांचा काय आहे दावा?
दुसरीकडे याबाबत काही जणांचं म्हणणं आहे की, कार्याध्यक्षांची निवड झालेली असतानाही सरपंचांनी मुद्दाम यात खोडा घालून मंदिराचा कारभार विस्कळीत व्हावा यासाठी प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ही बातमीही वाचा- राम नवमी सोहळा सुरु असतानाच मोठी दुर्घटना; इंदूरात मंदिराच्या विहिरीतच 25 जण बुडाले
संत बाळूमामा भक्तांची तीव्र नाराजी
संत बाळूमामा संस्थान हे मागील काही वर्षापासून फारच चर्चेत आलं आहे. एका टीव्ही वाहिनीवर बाळूमामांवरील मालिका सुरू झाल्यापासून या भागात भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. तसंच राज्यभरात बाळूमामांची महती पोहचल्याने त्यांच्या भक्तगणांमध्येही वाढ झाली आहे. एकीकडे संस्थानाचा लौकिक वाढत असताना दुसरीकडे विश्वस्त मंडळातील लोकांची थेट रस्त्यावर हाणामारी झाल्याने या संस्थानाच्या कारभाराला आता गालबोट लागलं आहे. तसंच याबाबत अनेक भक्तगणांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT