Tunnel Rescue : 41 मजुरांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारा ‘देवदूत’, कोण आहेत Arnold Dix?
Arnold Dix : ४१ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती ऑस्ट्रेलियाच्या अर्नोल्ड डिक्स यांनी. ते नेमके कोण आहेत आणि सरकारने त्यांनाच का बोलावले होते, याबद्दल जाणून घ्या…
ADVERTISEMENT
Tunnel Rescue, who is Arnold Dix : ऐन दिवाळीच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये ४१ मजूर अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर २८ नोव्हेंबर रोजी या मजुरांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले. या सगळ्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका ठरली ती अर्नोल्ड डिक्स यांची. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अर्नोल्ड डिक्स यांना बोलवण्यात आले होते. ते नेमके कोण आहेत, हेच जाणून घेऊयात…
ADVERTISEMENT
उत्तरकाशीच्या सिलक्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ते आता मोकळा श्वास घेत आहेत. पण 17 दिवस चाललेल्या या बचाव मोहिमेचे यश अर्नोल्ड डिक्सशिवाय अपूर्ण आहे.
अर्नोल्ड डिक्स यांची भूमिका कशी ठरली महत्त्वाची?
अर्नोल्ड यांनी कामगारांना बोगद्यातून बाहेर काढलेल्या तज्ञांमध्ये मोठी भूमिका बजावली. ते भूमिगत आणि वाहतूक पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ञ आहेत. ते केवळ भूमिगत बांधकामाशी संबंधित जोखमींबद्दल सल्ला देत नाही, तर त्यावर त्यांनी प्रभूत्व मिळवलेलं आहे.
हे वाचलं का?
Tunnel Rescue : डिक्स यांनी वचन दिलं अन् पूर्ण केलं
अर्नोल्ड डिक्स हे जिनिव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत. ही कंपनी भूमिगत बांधकामासाठी कायदेशीर, पर्यावरणीय, राजकीय आणि इतर जोखमींवर सल्ला देण्याचे काम करते.
हेही वाचा >> ‘त्या’ 41 जीवांसाठी अखंड डोंगर पोखरला अन् जिंकले युद्ध, रेस्क्यू टीमचा कसा होता प्रवास
अर्नोल्ड 20 नोव्हेंबर रोजी बोगद्यातील मजुरांसाठी सुरु करण्यात आलेल्या बचाव कार्याशी जोडले गेले होते. यानंतर त्यांनी सांगितलं होतं की, भारताला मदत करताना मला चांगलं वाटत आहे. डिक्स म्हणालेले की पर्वतांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे नम्र असणे.
ADVERTISEMENT
अर्नोल्ड डिक्स हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांनी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची नाताळपूर्वी सुटका केली जाईल, असा दावा केला होता.
ADVERTISEMENT
अर्नोल्ड डिक्स कोण आहे?
डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पण ते एक अभियंता, वकील आणि भूगर्भशास्त्रज्ञही आहेत. त्यांनी मेलबर्नच्या मोनाश विद्यापीठातून विज्ञान आणि कायद्याची पदवी घेतलेली आहे.
तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी 2016 आणि 2019 दरम्यान कतार रेड क्रिसेंट सोसायटीसाठी स्वयंसेवक म्हणून काम केले, जिथे त्यांनी अशाच भूमिगत घटनांवर काम केले. 2020 मध्ये, डिक्स लॉर्ड रॉबर्ट मेयर PTI Vickery QC च्या फर्ममध्ये सामील झाले. ते येथे तांत्रिक आणि नियामक सल्लागार आहेत.
हेही वाचा >> Pune Crime : आवडतं Gift दिलं नाही म्हणून बायकोने… पुण्यातील निखिलच्या हत्येची Inside Story
सरकारने बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी या बचाव मोहिमेसाठी इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष अर्नोल्ड डिक्स यांना बोलावले होते.
१२ नोव्हेंबरपासून अडकले होते मजूर
ही दुर्घटना दिवाळीच्या दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी घडली होती. या बोगद्यात हे मजूर काम करत होते. त्याचवेळी मातीचा ढीग कोसळला आणि मजूर पलिकडच्या बाजूने आत अडकले. तेव्हापासून या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती.
२६ नोव्हेंबरपासून सुरू केले रॅट मायनर्स ऑपरेशन
रविवारी म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी 6 ‘रॅट होल’ मायनर्स घटनास्थळी आणण्यात आल्या. ट्रेंचलेस इंजिनीअरिंग सर्व्हिसेस या खासगी कंपनीने या रॅट मायनर्स मागवल्या होत्या. त्यांनी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पाण्याच्या पाइपलाइन टाकताना त्यांची क्षमता दाखवून दिली आहे. उत्तरकाशीतील त्यांची काम करण्याची पद्धत ‘रॅट होल’ खाणकामापेक्षा वेगळी होती. या कामासाठी बोगद्यात तज्ज्ञ असलेल्या लोकांनाच पाचारण करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT