कार चालवतानाच फुटली श्वासनलिका, जगातील पहिलीच घटना
बीजेएम जर्नल्समध्ये एक लेख प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये कार चालवताना एका व्यक्तीचे श्वासनलिकाच फुटली आहे. अशा प्रकारे श्वासनलिका फुटण्याची ही पहिलीच घटना घडल्याचे बीजेएम जर्नल्सनेही सांगितले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी त्याची कारणंही सांगितली आहेत.
ADVERTISEMENT
Health Issue : तुम्ही कधी ऐकले आहे का की एकाद्या निरोगी व्यक्तीची श्वासनलिका (windpipe) काही न खाता पिता ती घशात फुटली आहे. ? अशी घटना तुम्ही कधीच ऐकली नसेल कारण ही घटना साधीसुधी आणि सामान्यही नाही. मात्र अशीच एक घटना आता घडली आहे आणि ती समोर आली आहे. ही घटना जगामध्ये अशी प्रथमच घडल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. बीएमजे जर्नल्समध्ये (BMJ Journals) प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारची झालेली ही पहिलीच दुखापत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
नैसर्गिक क्रिया प्रक्रिया
काही तज्ज्ञांचे मते असं सांगितले गेले आहे की, शरीरातील नैसर्गिक क्रिया प्रक्रिया आहे त्या कधीही थांबवू नये. खोकला, उलटी, लघवी या गोष्टी नैसर्गिक आहेत, त्यामुळे त्या कधी थांबवू नये असा सल्ला देण्यात आला आहे. कारण तसे करणे हे कुणाच्याही आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मात्र असाच एका व्यक्तीसोबतही घडला आहे. ज्या व्यक्तीबाबत ही घटना घडली आहे, तो माणूस कार चालवत होता, आणि त्याला अचानक शिंका आल्या होत्या. मात्र त्याने शिंकण्याऐवजी नाक मुरडले होते आणि तोंडही बंद केले होते.
हे ही वाचा >> अरे हxxxx, तुझ्या xxxxx… राजेश टोपेंना शिवीगाळ, बबनराव लोणीकरांची कथित ऑडिओ क्लिप Viral
मूर्खपणा पडला महागात
ज्या व्यक्तीने हा प्रकार केला त्याला त्याचाच मूर्खपणा महागातही पडला आहे. कारण शिंका थांबवल्यामुळे त्याच्या श्वासनलिकेला मोठा धोका पोहचला. त्याच्या श्वासनलिकेमध्ये दोन मिलिमीटरएवढे छोटे छिद्र पडले होते. कारण त्याने आलेल्या शिंका थांबवल्याने घशाच्या आतल्या बाजूला दाब निर्माण झाला होता. त्याच अवस्थेत ती व्यक्ती रुग्णालयात पोहचली तेव्हा त्याच्या मानेच्या दोन्ही बाजू सुजल्या होत्या, व त्याला त्याच्या प्रचंड वेदना होत होत्या. ही घटना त्याच्याबाबत घडल्यानंतही तो श्वास घेऊ शकत होता, व अन्नही गिळू शकत होता. त्यावेळी त्याला कोणतीच समस्या जाणवली नव्हती.
हे वाचलं का?
श्वास घेण्यास अडथळा
ज्या व्यक्तीला श्वासनलिकेबाबत समस्या निर्माण झाली होती, त्यानंतर एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरांना समजले की, त्या व्यक्तीला सर्जिकल एमफीसेमा नावाजा आजार होता. तो आजार असेल तर श्वसनाचा त्रास होऊन छाती आणि फुप्फुसामध्ये त्याचा त्रास होतो. त्यावेळी डॉक्टरांना त्यानंतर तज्ज्ञांनी त्याची तपासणी करून श्वास घेण्यास अडथळा येत असेल तर त्याची शस्त्रक्रिया करण्याचाही विचार डॉक्टरांनी केला होता. मात्र त्यानंतर त्याची गरज नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांना सांगितले…
ज्या व्यक्तीला हा त्रास झाला होता, त्याला दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. त्यानंतर औषधोपचार करून त्याला सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले, त्यावेळी त्या व्यक्तीला कोणतेही जड काम करू नका असा सल्ला देण्यात आला. या घटनेबाबत बीएमजे जर्नल्समध्ये एक लेखही प्रकाशित करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> आठ मुलींच्या बापानं केला दुसऱ्या लग्नाचा विचार, पत्नीला समजताच थेट सुपारीच…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT