Crime: तुरुंगात मैत्री, बाहेर येताच मित्राच्या पत्नीसोबतच… ‘त्या’ कृत्याने मैत्रिला फासला काळिमा
Kanpur Friend Murder: एका तरुणाने आपल्या मित्राच्याच पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवले आणि त्यानंतर प्रेमात अडथळा येत असल्याने मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT
Love Sex and Friend Murder: कानपूर: एका ऑटोचालकाची गळा चिरून हत्या (Murder) करण्यात आल्याच्या आरोपाखाली त्याच्या पत्नीलाच पोलिसांनी अटक केल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये (Kanpur) घडली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ऑटोचालकाची हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृताच्या पत्नीने (Wife) प्रियकराच्या (Boyfriend) मदतीने आपल्याच पतीची निर्घृण हत्या करून त्याला आपल्या मार्गातून हटवलं. पतीची हत्या केल्यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर हे फरार झाले. (a friendship in prison an immoral relationship with a friends wife upon release and then murdering the friend himself)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कानपूरमधील डेरापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 17 ऑगस्ट रोजी सकाळी पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली होती. सोहित जोशी असे मृताचे नाव असून तो सिकंदरा पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. पोलिसांना घटनास्थळी पार्क केलेली रिक्षा देखील सापडली होती. ज्यानंतर या घटनेच्या तपासासाठी पोलिसांचं एक विशेष पथक तयार करण्यात आलं होतं.
हे ही वाचा >> Mumbai Crime : अल्पवयीन मुलगी रिक्षात बसली अन् वासनांध चालकाने…धक्कादायक घटनेने शहर हादरलं
पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर आता या हत्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पोलिसांनी मृत सोहितची पत्नी प्रतिमा आणि त्याचा मित्र कन्हैया पांडे आणि कन्हैयाचा मित्र प्रदीप कुमार यांना अटक केली आहे. मृत सोहित आणि कन्हैया यांची 9 वर्षांपूर्वी तुरुंगात मैत्री झाली होती, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर कन्हैया हा वरचेवर मृत सोहितच्या घरी यायचा. याच दरम्यान, कन्हैया आणि सोहितची पत्नी प्रतिमा यांचे सूत जुळलं आणि अनैतिक संबंध देखील प्रस्थापित झाले. यानंतर सोहितची पत्नी आणि कन्हैया यांनी मिळून सोहितलाच आपल्या वाटेतून दूर करण्याचा भयंकर कट रचला. त्यानुसार रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने कन्हैयाने त्याच्या दोन मित्रांसह वाटेतच सोहितचा गळा चिरून हत्या केली आणि त्यानंतर तो फरार झाला.
या घटनेबाबत पोलीस काय म्हणाले?
कानपूर देहातचे एसपी बीबीजीटीएस मूर्ती यांनी सांगितले की, डेरापूर पोलीस स्टेशन हद्दीतील रस्त्यावर मृतदेह सापडला होता, ज्याचे नाव सोहित जोशी असे असून तो सिकंदरा पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. घटनेचा खुलासा करत पोलीस आणि पाळत ठेवणाऱ्या पथकाने कन्हैया पांडे, प्रदीप कुमार आणि मृत सोहितची पत्नी प्रतिमा यांना अटक केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Rajinikanth Yogi Adityanath : रजनीकांत आदित्यनाथांच्या पाया का पडले? अखेर उत्तर मिळालं
ADVERTISEMENT
चौकशीदरम्यान कळले आहे की, कन्हैया 2014 मध्ये तुरुंगात होता, तेव्हा त्याची कारागृहातच सोहितशी मैत्री झाली होती. त्यानंतर कन्हैयाचे सोहितच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. कन्हैया आणि सोहितच्या पत्नीसह त्यांचे मित्र अभिनव तिवारी नंदू आणि प्रदीप कुमार यांनी सोहितच्या हत्येचा कट रचला होता. त्यामुळे आता या सगळ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT