Anjali Murder Case : पोटच्या पोरीनेच प्रियकराच्या मदतीने काढला आईचा काटा, कारण…
अंजली यांची अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंड प्रखर गुप्ताने पोलिसांसमोर मोठे खुलासे केले आहेत. अंजली बजाज यांच्या हत्येचे षडयंत्र त्याच्याच मुलीने रचल्याची माहिती प्रखऱ गुप्ताने दिली आहे. त्यामुळे मुलीनेच आईच्या हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT
Anjali Murder Case : प्रेमात कधी कोण काय करून बसेल, याचा नेम नाही. कुणी प्रेमाखातर कुणाच्या जीवावर उठलं, तर कुणी स्वत: च आत्महत्या करेल, अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यात आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत पोटच्या पोरीने आईच्या हत्येचा कट रचल्याची घटना घडली आहे. बॉयफ्रेंडसह मिळून तिने हे सर्व कटकारस्थान रचलं होते. ते ही निव्वळ प्रेमाखातर. हे हत्याकांड होतं, अंजली बजाज हत्याकांड (Anjali Murder Case). या हत्याकांडात आता पोलिसांनी दोन तरूणांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरूणांनी आता अंजली बजाज हत्याकांडाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. (anjali murder case daughter along with her boyfried killed her mother agra shocking story)
ADVERTISEMENT
काय आहे अंजली बजाज हत्याकांड ?
पोलिसांनी अंजली बजाज हत्याकांड (Anjali Murder Case) प्रकरणात दोन आरोपिंना अटक केली आहे. या दोनही आरोपींनी या हत्याकांडाबाबत चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. अंजली यांची अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंड प्रखर गुप्ताने पोलिसांसमोर मोठे खुलासे केले आहेत. अंजली बजाज यांच्या हत्येचे षडयंत्र त्याच्याच मुलीने रचल्याची माहिती प्रखऱ गुप्ताने दिली आहे. त्यामुळे मुलीनेच आईच्या हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा : Mira Road Murder: मृतदेहाचे अर्धे तुकडे केल्यानंतर मनोज का गेलेला ‘या’ दुकानात?
प्रेमात ठरली अडसर…
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली बजाज यांची मुलगी आणि प्रखर यांच्यात प्रेमसंबंध सुरु होते. मुलीच्या या प्रेमप्रकरणाची माहिती अंजलीला देखील होती.त्यामुळेच अंजली तिला प्रखरसोबत भेटून द्यायची नाही. याच कारणामुळे अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंडच्या मदतीने आईचा काटा काढण्याचा निर्णय़ घेतला होता. आणि त्यानुसार हत्येचा कट रचला.अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंड प्रखरने पैशाचे आमिष दाखवून गंजडुडवाराचा रहिवासी असलेल्या एका ओळखीच्या मित्राला या घटनेत सामील करून घेतले होते. त्यानंतर हत्येची संपू्र्ण योजना आखली.
हे वाचलं का?
8 जूनला प्रखर त्याचा मित्र शीलू आणि अंजली बजाजच्या अल्पवयीन मुलीने अंजली आणि वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून हत्याकांड घडवलं.यावेळी संधी पाहून प्रखऱ आणि शीलूने अंजली बजाज यांची हत्या केली आणि मृतदेह तेथेच सोडून पळ काढला. या हत्याकांडानंतर मुलगी वडिलांना फोन करून त्यांची दिशाभूल करत राहिली.
ठरल्यानुसार अप्लवयीन मुलगी अंजली यांना शास्त्रीपुरम बाजारात जात असल्याचे सांगून घरातून निघाली. अनेक तास उलटून देखील तरूणी घरी न परतल्याचे पाहून अंजली यांनी कार घेऊन मुलीची शोधाशोध सुरु केली. काही वेळानंतर मुलीचाच अंजली यांना मेसेज येतो की, आई मला घ्यायला बनखंडी महादेव मंदिरात या. यानंतर अंजली यांनी त्यांच्या पतीला देखील या स्थळाची माहिती दिली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : डोळ्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसला, ब्लेडने गळा चिरळा, 19 वर्षीय तरूणीची निर्घृण हत्या
अंजली आणि उदीत (आई-वडिल) घटनास्थळी पोहोचत असताना मुलीने वडिलांना फोन करून दुसऱ्या ठिकाणी बोलावले, जेणेकरून त्यांना अंजलीची हत्या करता यावी. मुलीच्या सांगण्यावरून उदीत अंजलीला मंदिर परीसरात सोडून दुसऱ्या ठिकाणी निघाले. मात्र याच दरम्यान मुलीने पुन्हा एकदा वडिलांना फोन करून घरी पोहोचल्याची माहिती दिली.मुलीने ही माहिती देताच वडिल अंजली यांना घेण्यासाठी मंदिर परिसरात पोहोचले, मात्र त्यांना अंजली काही सापडल्या नाही, त्यामुळे त्यांना सिकंदरा जाऊन अंजली बेपत्ता झाल्याची तक्रार द्यावी लागली.
ADVERTISEMENT
या दरम्यान चौकशीत पोलिसांना अंजली याचा मृतदेह सापडला. हा मृतदेह सापडल्यानंतक पोलिसांनी हत्येचा तपास सूरू केला. या घटनेनंतर तीनही आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करून मुलीचा बॉयफ्रेंड प्रखर गुप्ता आणि शिलू यांना अटक केली.तर अंजली यांची मुलगी अद्याप फरार आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा उलगडा होताच सर्वांनाच मोठा धक्का बसला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT