Bengaluru :’मी आईचा जीव घेतला’ मृतदेह बॅगेत भरुन उच्च शिक्षित तरुणी थेट पोलीस स्टेशनमध्ये!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

देशभरात गुन्ह्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिल्लीच्या शाहबाद डेअरी हत्याकांड असो किंवा मिरा रोडमधील लिव्ह इन पार्टनर हत्याकांड असो, या सर्व घटनांनी संपूर्ण देश हादरला आहे. आता कर्नाटकातून (Karnataka) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 39 वर्षीय फिजीओथेरपीस्ट (Daughter) तरूणीने जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येनंतर तरूणी आईचा मृतदेह (Dead Body) बॅगेत भरून पोलीस ठाण्यात पोहोचली होती. यावेळी तरूणीने स्वत:च आईची हत्या केल्याची कबूली देत, मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तरूणीला अटक करून चौकशी सूरू केली आहे. (bengaluru daughter kills mother and brings dead body in suitcase mico layout police station)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय फिजीओथेरपीस्ट तरूणी एक बॅग घेऊन माइको लेआऊट पोलीस स्टेशनला पोहोलची होती.यावेळी पोलीस तिची चौकशी करतील याआधीच तिने सर्व घटनाक्रम सांगायला सुरुवात केली. तरूणीने सांगितले की,मी एक फिजीओथेरपीस्ट आहे. माझी आणि माझ्या आईची नेहमी भांडणे व्हायची. याच दररोजच्या भांडणाला वैतागून मी माझ्या आईची हत्या केली आहे. तसेच तरूणीने सांगितले की, मला हत्या करून पळायचे नव्हते, म्हणूनच मी आईच्या मृतदेहाला बॅगेत भरून पोलिस ठाण्यात आणले असल्याचे तिने सांगितले आहे.

हे ही वाचा : क्रिकेट मॅचमध्ये अंपायरला गोळ्या घालणाऱ्या छोटा राजनच्या खास शूटरचा मृत्यू

तरूणी पुढे सांगते की, मी मुळची पश्चिम बंगालची रहिवाशी आहे. तिकडे मी माझा पती, सासू आणि आईसोबत राहते. तसेच ज्यावेळेस तिने हे हत्याकांड केले, त्यावेळेस ना तिचा पती घरी होता, ना तिची सासू घरी होती. याचाचा फायदा उचलत तिने आईची हत्या केली. त्यानंतर पोलिस ठाण्य़ात जाऊन हत्येची कबूली दिली. सध्या पोलिसांनी आरोपी फिजीओथेरपीस्टला ताब्यात घेतले आहे. तसेच या घटनेचा तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान अशीच घटना आग्र्यात देखील घडली आहे. या घटनेत पोटच्या पोरीने आईच्या हत्येचा कट रचल्याची घटना घडली आहे. बॉयफ्रेंडसह मिळून तिने हे सर्व कटकारस्थान रचलं होते. हे हत्याकांड होतं, अंजली बजाज हत्याकांड (Anjali Murder Case). या हत्याकांडात आता पोलिसांनी दोन तरूणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंजली बजाज यांची मुलगी आणि प्रखर यांच्यात प्रेमसंबंध सुरु होते. मुलीच्या या प्रेमप्रकरणाची माहिती अंजलीला देखील होती.त्यामुळेच अंजली तिला प्रखरसोबत भेटून द्यायची नाही. याच कारणामुळे अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंडच्या मदतीने आईचा काटा काढण्याचा निर्णय़ घेतला होता. आणि त्यानुसार हत्येचा कट रचला होता. या प्रकरणात आता दोन्ही तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मुलगी फरार आहे.

हे ही वाचा : Anjali Murder Case : पोटच्या पोरीनेच प्रियकराच्या मदतीने काढला आईचा काटा, कारण…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT