Crime: प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टवरच प्रियकराने झाडली गोळी!
गेल्या तीन वर्षापासून एकतर्फी प्रेम करत असलेल्या प्रियकराने मुलीच्या घरातील मंडळी लग्नाला विरोध करत असल्याने कुटुंबीयांसह प्रेयसीवरही गोळीबार केल्याने दोघांचा मृत्यू होऊन चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र प्रियकर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
Bihar Crime : बिहारमध्ये छठ उत्सवाचा समारोप होत असतानाच बंदुकीच्या गोळीबाराने बिहार (Bihar ) हादरून गेले आहे. हा सण मोठ्या उत्सावात साजरा होत असताना विचित्र घटना घडल्यामुळे छठ पूजेला (Chhath Puja) गालबोट लागले होते. कारण वैशालीमध्ये फटाके फोडण्यावरून झालेल्या वादामुळे एकाचा मृत्यू झाला आहे तर त्याच घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे लखीसरायच्या पंजाबी मोहल्लाही गोळीबार (Firing) झाल्याने हादरला आहे. या मोहल्ल्यातील एका प्रेमवेड्याने मुलीच्या कुटुंबीयांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. प्रेयसीच्या घरातील मंडळी त्यांच्या लग्नाला विरोध करत होते, व ते सातत्याने त्यांच्या लग्नात अडथळा आणत होते. त्याच गोष्टीचा मनात राग धरुन छठ पूजा संपवून मुलीचे कुटुंबीय घाटावरून घरी परतत होते. त्यावेळी मुलीच्या प्रियकराने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
एकतर्फी प्रेमातून टोकाचं पाऊल
पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांवर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आशिष चौधरी आहे. आशिष चौधरी हा आपल्या घरासमोर राहत असलेल्या मुलीवर गेल्या तीन वर्षापासून एकतर्फी प्रेम करत होता. त्यासाठी त्याने मुलीला लग्नासाठीही विचारणा केली होती. मात्र मुलीच्या घरातील कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. कुटुंबीयांनी केलेल्या विरोधाचा मनात राग धरुनच त्याने मुलीच्या कुटुंबीयांवर गोळीबार केला.
हे ही वाचा >>Mitchell Marsh : वर्ल्ड कप विजयाचा माज, ट्रॉफीवरच ठेवला पाय! ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ‘त्या’ कृतीवर पेटला वाद
कुटुंबावर केलं फायरिंग
यावेळी प्रेयसी मध्येच आल्याने तिच्या प्रायव्हेट पार्टवर गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेयसीबरोबरच तिच्याच घरातील आणखी एकाच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याचाही मृत्यू झाला आहे. दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आणि 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे वाचलं का?
घरासमोरच केला हल्ला
पोलीस उपाधीक्षक पंकज कुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, पंजाबी मोहल्लामधील एकाच कुटुंबातील 6 जणांना गोळी लागली आहे. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. प्रेयसीच्या घरासमोर राहणारा प्रियकर आशिष चौधरीने गोळीबार केला असून त्याला पकडण्यासाठी आता वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
हे ही वाचा >> Richard Kettleborough : वर्ल्ड कप टीम इंडिया हरली, पण अंपायर का होतोय ट्रोल?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT