Kolhapur Crime : तलवार, कोयता दाखवून दहशतीचा रुबाब केला; पोलिसांना समजताच…
kolhapur crime : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात हातात तलवार, कोयता आणि लोखंडी रॉड घेऊन. त्याचा व्हिडिओ करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
ADVERTISEMENT
Kolhapur Crime : शस्त्रांचा धाक दाखवत सोशल मीडियावरती आपला व आपल्या साथीदारांचा व्हिडिओ एका तरुणांच्या ग्रुपने व्हायरल (viral video) केला. तो व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी थेट ज्यांनी ज्यांनी शस्त्र हातात घेऊन व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर तलवार, कोयता, लोखंडी रॉड ,काट्या, दाखवत आपल्याला या परिसरात दहशत राहावी या हेतूने 8 जणांनी व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर मात्र पोलिसांनी त्या 8 युवकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. (create terror in Karveer taluka of kolhapur district with sword and iron rod hand)
ADVERTISEMENT
दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील हसूर दुमाला इथं राहुल पोवार तसंच म्हालसवडेतील नागेश पाटील आणि सूरज वरुटे यांनी गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दहशत निर्माण करण्यासाठी कोल्हापुरातील तरुणांना राहुलने काही तरुणानं बोलावून घेतलं होतं. हातात शस्त्र घेऊन बेकायदेशीर जमावानं 26 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता गावातील शिवाजी चौकात दहशत माजवली होती. याप्रकरणी करवीर पोलिसांनी आता 8 संशयितांना अटक केली आहे. न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर मंगळवारी त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा >> शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम, पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले…
सोशल मीडियावर तलवार, कोयता
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथील राहुल पोवार हा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला गावातील काही ग्रुपवर वर्चस्व ठेवायचं होतं. यातूनच त्यानं 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला, कोल्हापुरातील काही तरुणांना आपल्या गावात बोलवून घेतले. गावातील शिवाजी चौकात बेकायदेशीर जमाव जमवला होता. तसेच हातात तलवार, एडका, चाकू, लोखंडी पाईप आणि काठ्या घेऊन मोठंमोठ्यानं आरडा-ओरडा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बराच वेळ चौकात गोंधळ घालून, दहशत माजवण्याचाही त्या आठ जणांनी प्रयत्न केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पोलिसांनी मुसक्या आवळल्या
याप्रकरणाची करवीर पोलिसांना माहिती मिळताच, आयपीएस अन्नपूर्णा सिंह, हवालदार सुजय दावणे, रणजित पाटील, राहुल देसाई यांच्यासह कर्मचार्यांचं पथक हसूर दुमाला इथं दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांनी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एकजण अल्पवयीन असल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील राहुल पोवार, अक्षय बागडी, आदित्य गोसावी, करण फाळके, रोहन गायकवाड, ऋतुराज चौगुले, नागेश पाटील, सूरज वरुटे यांना अटक करुन न्यायालयात उभं केलं असता, न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर आज त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आले आहे.
हे ही वाचा >> LPG Price : सत्ताधाऱ्यांना INDIA ने घाम फोडला, दोन बैठकीतच गॅस स्वस्त केले…
ADVERTISEMENT