डेटिंग अॅपवर भेट, 3 दिवस कारमध्ये ठेवला मृतदेह; ‘त्या’ हत्येची Inside Story
Delhi crime news : 11 ऑक्टोबर रोजी स्वित्झर्लंडहून दिल्लीत आलेल्या महिलेची तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली. आरोपी गुरप्रीतने महिलेला हॉटेलबाहेर बोलावून विष्णू गार्डन नेले. तिथे गेल्यानंतर गुरप्रीतने तिचा गळा दाबून खून केला.
ADVERTISEMENT
Delhi crime Swiss women murder : दिल्लीतील टिळक नगरमध्ये एका परदेशी महिलेच्या हत्येची कहाणी अंगाचा थरकाप उडवणारी आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, गुरप्रीत सिंग असे त्याचे नाव आहे. तो दिल्लीतील जनकपुरी येथील रहिवासी आहे. गुरप्रीतने पोलिसांना सांगितले की, त्याने काही वर्षांपूर्वी एका डेटिंग अॅपद्वारे मयत महिलेशी मैत्री केली होती. यानंतर तो तिच्याशी बोलू लागला आणि भेटू लागला. त्यानेच महिलेला स्वित्झर्लंडहून भारतात बोलावले होते.
ADVERTISEMENT
आरोपीने सांगितले की, महिला दिल्लीत आल्यानंतर तिच्यासोबत फोनवरुन बोलत होतो. चार महिन्यांसाठी महिलेला भेटण्यासाठी तो स्वित्झर्लंडलाही गेला होता. गुरप्रीतने सांगितले की, महिलेचे इतर लोकांशीही संबंध असल्याचा संशय होता. यामुळे तो संतापला होता.
11 ऑक्टोबर रोजी ही महिला स्वित्झर्लंडहून दिल्लीत आली आणि पश्चिम दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबली. गुरप्रीतने महिलेला हॉटेलबाहेर बोलावून विष्णू गार्डन परिसरात नेले. महिलेला तिथे नेण्यापूर्वी त्याने महिलेला सांगितले की सरप्राईज करायचे आहे. तिथे गेल्यानंतर गुरप्रीतने तिचा गळा दाबून खून केला.
हे वाचलं का?
दुर्गंधी येऊ लागल्यावर महापालिका शाळेजवळ टाकला मृतदेह
आरोपी गुरप्रीतने महिलेचे हात पाय साखळदंडाने बांधले होते. हत्येनंतर मृतदेह गाडीत ठेवला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागेच्या शोधात तो परिसरात फिरत राहिला. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, असे वाटल्याने तो पकडला जाऊ नये, म्हणून त्याने घराजवळ कार उभी केली आणि मृतदेह कारमध्ये टाकून दिला. जेव्हा दुर्गंधी येऊ लागली तेव्हा त्याने हत्येनंतर दोन दिवसांनी मृतदेह महापालिकेच्या शाळेजवळ फेकून दिला.
हे ही वाचा >> Maratha Reservation : जरांगेंचा अल्टिमेटम संपण्याआधीच शिंदे सरकारची जाहिरात, मुद्दा चिघळणार?
गुरप्रीतशिवाय या महिलेची ओळख पटवणारा एकही व्यक्ती पोलिसांना सापडला नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुरप्रीतच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. गुरप्रीत सतत आपले वक्तव्य बदलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT
काय होती संपूर्ण घटना?
टिळक नगर एमसीडी शाळेजवळ एका महिलेचा हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. महिलेचे वय अंदाजे 30 वर्षे होते. तिचे शरीर प्लास्टिकच्या पिशवीने झाकलेले होते आणि हात-पाय साखळदंडांनी बांधलेले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात पांढऱ्या रंगाची कार दिसली. त्या गाडीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. गाडी जिथून गेली, त्या मार्गांचे सीसीटीव्ही पोलिसांनी स्कॅन केले. यानंतर पोलीस गाडीच्या मालकापर्यंत पोहोचले.
ADVERTISEMENT
आरोपीने 2 लाख रुपयांत घेतली होती सेकंड हँड कार
ही कार एका महिलेच्या नावावर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्लीतील जनकपुरी येथे राहणार्या गुरप्रीत सिंहने महिलेच्या नावावर 2 लाख रुपयांना सेकंड हँड कार खरेदी केली होती. आरोपीला पोलिसांची दिशाभूल करायची होती, त्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या महिलेच्या नावाने ही कार खरेदी करण्यात आली होती, तिने पोलिसांना सांगितले की, गुरप्रीतने तिच्या कागदपत्रांचा वापर करून कार खरेदी केल्याचे तिला माहित नव्हते.
आरोपी गुरप्रीतच्या घरात सापडली 2.10 कोटींची रक्कम
पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा जनकपुरी येथून कार जप्त केली. यानंतर आरोपी गुरप्रीतला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. आरोपी गुरप्रीत सिंग जनकपुरी येथे आई-वडील आणि बहिणीसोबत राहतो. पोलिसांनी त्याच्या घरातून 2.10 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
हे ही वाचा >> Pune : पुण्यातील रस्त्यावर थरार! मद्यधुंद बसचालकाने उलटी पळवली बस, 15 वाहनांना उडवले
मयत महिलेबद्दल काय म्हणाले डीसीपी?
महिला स्वित्झर्लंडची रहिवासी होती का? या प्रश्नाबाबत डीसीपी (पश्चिम) विचित्र वीर म्हणाले की, सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत. स्वित्झर्लंडमधील झुरीच येथील एका महिलेशी संबंधित काही कागदपत्रे पोलिसांना सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत स्विस दूतावासाशी संपर्क साधला जात आहे.
आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी गुरप्रीत सिंगला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरप्रीतच्या कुटुंबाकडे अनेक मालमत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT