मेकॅनिकल इंजिनिअरने घातला कोट्यवधींचा गंडा, आरोपीच्या कारनाम्याने चक्रावले पोलीस
आर्थिक व्यवहार करण्यासाठी आधार आणि पॅनकार्ड आता सक्तीचे आहे. ते गरजेचे असल्याने अनेक जण ते बॅंके कर्मचाऱ्यांकडे बिनधास्त देतातही. मात्र अशाच एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने दुसऱ्याचे आधार आणि पॅनकार्ड घेऊन अनेक कंपन्यांसह नागरिकांनाही कोट्यवधींचा गंडा घातला आहे.
ADVERTISEMENT
देव कोटक, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह नवी मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच एका उच्चशिक्षित व्यक्तीकडून आर्थिक घोटाळा करत नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनची (Non Banking Financial Corporation) कोट्यवधीं रुपयांची फसवणूक केली आहे. एनबीएफसीकडून दुचाकी आणि दुचाकींसाठी दिलेल्या कर्जामध्ये फसवणूक (Fraud in loans) केल्यामुळे मरिन ड्राइव्ह पोलिसांनी नवी मुंबईतील खारघरमधील (Kharghar) एका 49 वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
एकाच्या नावावर अनेक कारनामे
नॉनबँकिंग वित्तीय कंपनीकडून दुचाकी खरेदीसाठी 2020 मध्ये मोहित वाळेकरने कर्जासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्याने सर्व कागदपत्रंही कर्ज देणाऱ्या कंपनीकडे सादर केली होती. त्यानंतर मोहित वाळेकरला फायनान्स कंपनीकडून कर्ज देण्यात आले. मात्र काही दिवसांनी त्याने कर्जाचे हफ्ते भरणे बंद केले. त्याच्याकडून कर्जाचे मासिक हफ्ते भरणे बंद झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाळेकरने दिलेल्या पत्त्यावर भेट दिली, मात्र तो प्लॅट रिकामा दिसला. त्यावेळी वाळेकरने कर्ज घेताना दुसराही पत्ता दिला होता. मात्र त्या ठिकाणीही दुसरेच कोणीतरी राहत असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे या प्रकरणाविरोधात मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा >> भ्रष्टाचाराची भली मोठी कीड… 1 कोटीची लाच घेणारा महाराष्ट्रातील हा अधिकारी तरी कोण?
आधार-पॅनकार्डवरही बदल
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपअधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, सचिन बिल्लूर या व्यक्तीने अनेकांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करुन वेगवेगळ्या व्यक्तींची बनावट आधार आणि पॅनकार्ड तयार करुन ती कर्जासाठी सादर केली आहे. आधार आणि पॅनकार्डवरील फोटो बदलून त्यांच्या नावाने कागदपत्रे तयार करत होता. त्यामुळे त्यावरील पत्ता तोच राहत होता. त्यामुळे असे कारनामे करुन त्याने एनबीएफसीमध्ये कर्जासाठी कागदपत्रे जमा करण्यात आली होती.
हे वाचलं का?
बिल्लूर या गुन्ह्यात 2019 पासून
पोलीस अधिकाऱ्यांच्या तपासानंतर असं समजलं की, दोन आठवड्यात 89 लाखांच्या 17 दुचाकी आणि 6 कार जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर सचिन बिल्लूर हा या गुन्ह्यात 2019 पासून असल्याचे स्पष्ट झाले आहे. कागदपत्रांमध्ये बदल करुन त्याने अनेकांना गंडा घातल्याचेही पोलिसांनी सांगितले.
मर्सिडीजसह कारही घेतल्या ताब्यात
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून मर्सिडीजसह 40 लाखांच्या कार आणि 3 वाहनंही ताब्यात घेतली आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक राकेश शिंदे यांनी सांगितले की, आरोपीकडून दुचाकी खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना भेटत होता. त्यांची विाचरपूस करुन त्यांना वाहन खरेदीसाठी मार्गदर्शन करत होता. मात्र एकदा कर्ज मंजूर झाल्यानंतर मात्र बँक आणि इतर कोणीही त्यांच्यापर्यंत पोहचू शकणार नाहीत याची तो काळजी घेत होता.
ADVERTISEMENT
सचिन बिल्लूर ‘उच्चशिक्षित’
सचिन बिल्लूर हा मेकॅनिकल इंजिनीयरिग असून तो पदव्युत्तर पदवीधर आहे. उच्च शिक्षित असणाऱ्या सचिन बिल्लूरने कागदपत्रांची फेरफार करुन त्याने पगारस्लिपही सादर करुन बँक, आणि वित्तीय कंपन्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी आता सचिन बिल्लूरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पत्नीसह दोन मुली असून 5 नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Crime : लव्ह, सेक्स आणि धोका! ब्रेकअपनंतर अश्लील व्हिडीओ बनवून..,तरूणीसोबत काय घडलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT