Gadchiroli: सून आणि मामीने 5 जणांना कसा भरवला विषाचा घास?, मृत्यूच्या तांडवाची Inside Story
Gadchiroli 5 Person Murder Case: गडचिरोलीतील दोन महिलांनी आपल्याच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. याच घटनेबाबत आता स्वत: दोन्ही आरोपी महिलांनी खळबळजनक कबुली जबाबही दिला आहे.
ADVERTISEMENT
Gadchiroli 5 Death Mystery and 2 Women: व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली: गडचिरोलीतील (Gadchiroli महागावमधील एकाच कुटुंबातील 5 सदस्यांच्या हत्येने (Murder) अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणातील नवनवी माहिती आता समोर आली आहे. दोन महिलांनी मिळून अख्खं कुटुंब कसं संपवलं, पाच जणांची हत्या (Five people killed) करताना कसा कट रचला या सगळ्याबाबत दोन्ही आरोपी महिलांनी पोलिसांना आपला जबाब दिला आहे. जाणून घ्या याच घटनेबाबत सविस्तरपणे. (gadchiroli how did daughter in law and aunt killed 5 people in one family with poison inside story of death toll)
ADVERTISEMENT
दोन महिलांनी थंड डोक्याने कसं संपवलं कुटुंबातील पाच जणांना?
या प्रकरणी कुंभारे कुटुंबातील शंकर कुंभारे, विजया कुंभारे हे दोघे पती-पत्नी मृत्यू पावले. ज्यांची अहेरी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दोघांच्या मृत्यूनंतर शंकर कुंभारेची मुलगी कोमल दहागावकर ही 8 ऑक्टोबरला मरण पावली. तर त्यानंतर शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे याचा 15 ऑक्टोबरला उपचारादरम्यान मरण पावला. त्याआधी त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे ही अंत्यसंस्कारासाठी महागावला आली होती. तिचा देखील 14 ऑक्टोबरच्या मृत्यू झाला होता.
सुरुवातीला या पाचही जणांच्या अहेरी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण एकाच घरातील पाच लोकांचा मृत्यू झाल्याने अहेरी पोलिसांना यामध्ये घातपाताचा संशय आला. ज्यानंतर महागाव येथे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते.
हे ही वाचा >> Lalit Patil: ललितच्या महिला मैत्रिणी अन्… नवा ट्विस्ट; ‘त्या’ 2 महिला नेमक्या कोण?
एकाच घरचे पाच लोकांचे मृत्यू झाले हा जादूटोण्याचा प्रकार असावा असा दावा कुंभारे कुटुंबाची सून संघमित्रा कुंभारे आणि मृत रोशन कुंभारे याची मामी रोजा रामटेके यांनी केला होता. पण एकीकडे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालेला असताना संघमित्रा आणि रोजा यांची प्रकृती अगदीच ठणठणीत होती. त्यामुळेच पोलिसांची संशयाची सुई त्या दोघींकडे वळली. त्यामुळे अहेरी पोलिसांनी दोघींनाही तात्काळ ताब्यात घेतलं. सुरुवातीला या दोघींनीही पोलिसांना फारशी दाद दिली नाही. मात्र पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच दोघींनीही हा घातपाताचा प्रकार असून त्यांच्या मृत्यूचा कट रचल्याचा जबाब पोलिसांना दिला.
ADVERTISEMENT
दोघींचा हा जबाब समोर येताच महागावसह संपूर्ण गडचिरोली जिल्हाच यावेळी हादरून गेला. कारण घरातील तरुण मुलाच्या बायकोने आणि त्याच्या मामीने त्याच्यासह एकूण पाच जणांना अत्यंत पद्धतशीरपणे संपवलं.
ADVERTISEMENT
या प्रकरणातील मुख्य आरोपी ही संघमित्रा कुंभारे आहे. जी रोशन कुंभारे यांची पत्नी आहे. जिने मामी रोजा रामटेकेच्या साथीने हा सगळा कट रचला. वेळ आणि काळ पाहून संघमित्राने रोजा मामीच्या साथीने हे ठरवलं की, कोणाला विष हे पाण्यातून द्यायचं, कोणाला डाळीमधून तर कोणाला मटणाच्या भाजीतून… आणि याच पद्धतीने पाच जणांचा जीव घेतल्याची कबुली ही संघमित्रा आणि रोजा यांनी पोलिसांसमोर दिली आहे.
पाच जणांना नेमकं कसं दिलं दोघींनी विष?
कुंभारे कुटुंबातील पाचही लोकांना विषाचा प्रभाव झाल्याने त्यांची अचानक प्रकृती बिघडायची आणि हळूहळू त्यांची तब्येत ढासळत होती. सुरुवातीला कोणाला उलट्या, तर कोणाला अतिसार सुरू झाले. त्यामुळे आपल्यावर विषप्रयोग झाला आहे असा कुणालाही संशयच आला नाही.
पण घरातीलच दोन महिलांनी पाच जणांची अशाप्रकारे हत्या का केली? हाच प्रश्न पोलिसांसमोर होता. ज्याचं उत्तर दोन्ही आरोपी महिलांनी चौकशीत दिलं.
हे ही वाचा >> Gadchiroli: भरवला विषाचा घास… घरातल्याच 2 बायकांनी संपूर्ण कुटुंबच संपवलं, विदर्भात खळबळ
जबाबानुसार, सून संघमित्रा कुंभारे हिचा सासरच्या लोकांकडून छळ केला जात होता. तर तिचा नवरा रोशन कुंभारे हा तिला सातत्याने मारहाण करत होता. याचाच सूड घेण्यासाठी संघमित्रा हिने घरातील सर्वांवर विषप्रयोग केला.
महागाव येथे 20 दिवसात पाच लोकांचा मृत्यू झाल्याने गावात एकच चर्चा सुरू झाली होती. कोणीतरी जादूटोणा करून हत्या केली असं काही गावकरी सुरुवातीला म्हणत होते. पण कुटुंबातील सून आणि रोशनची मामी यांची तब्येत ठणठणीत होती. त्यामुळे रोशन कुंभारे आणि मावशी आनंदा उंदीरवाडे यांचा अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांनी संघमित्रा आणि रोजा यांना तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली.
दरम्यान, 18 ऑक्टोबरला आरोपींना अहेरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 दिवसाची पोलीस कोठडी दोघींनाही सुनावली आहे. या प्रकरणात आणखी 8 आरोपी गुंतले असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या 20 दिवसाच्या तपासात नवीन काय माहिती पुढे येईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT