Gadchiroli: कुंभारे कुटुंबाला सुनेने ‘या’ विषाचा भरवला घास, ‘यासाठी’ काढला काटा!
Gadchiroli 5 Death Mystery: गडचिरोली जिल्ह्यातील महागावच्या कुंभारे कुटुंबातील 5 जणांची हत्या करण्यासाठी प्रतिबंधित थॅलियम धातूचा वापर केल्याचा कबुली जबाब आरोपी सून व मामीने पोलिसांना दिला आहे.
ADVERTISEMENT

Gadchiroli 5 Person Murder Case poison: व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली: अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथील कुंभारे परिवारातील पाच जणांच्या हत्येने अवघा गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा हादरून गेला आहे. सुनेनेच अख्ख्या कुटुंबाला संपवल्याची खळबळजनक घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणातील वेगवेगळी माहिती देखील आता उजेडात येत आहे. अत्यंत विषारी द्रव्याचा वापर करुन सून संघमित्रा कुंभारे (Sanghmitra Kumbhare) हिने ही हत्या (Murder) केल्याचं समोर आलं आहे. जगातील अनेक देशांनी प्रतिबंधित केलेल्या थॅलियम धातूचा वापर केलेल्या विषाचा वापर करुन संघमित्राने पाच जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हे आता वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. आरोपी संघमित्रा हिने थॅलियम धातू तेलंगणा राज्यातून मिळविल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असले तरी त्याचा मुख्य स्त्रोत शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे. (gadchiroli massacre revealed that daughter in law and aunt used banned thallium metal to kill 5 members of the kumbhare family)
नेमकं प्रकरण काय?
26 सप्टेंबर 2023 रोरजी कुंभारे कुटुंबातील प्रमुख शंकर कुंभारे हे आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबरला पत्नी विजया यांचा मृत्यू झालेला. पुढे 8 ऑक्टोबरला कुभांरेंची विवाहित मुलगी कोमल दहागावकर, 14 ऑक्टोबरला आनंदा उराडे, तर 15 ऑक्टोबरला संघमित्राचा पती रोशन याचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी त्याची दखल घेतली.
हे ही वाचा >> Gadchiroli: सून आणि मामीने 5 जणांना कसा भरवला विषाचा घास?, मृत्यूच्या तांडवाची Inside Story
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी पाचही जणांच्या मृत्यूप्रकरणी संघमित्रा कुंभारे आणि मृत रोशन कुंभारे याची पत्नी रोजा रामटेके यांना ताब्यात घेतलं. ज्यानंतर या प्रकरणातील गूढ उकललं गेलं. न्यायालयाने दोघींना 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. तपासादरम्यान दोघींनी धातूमिश्रीत विष देऊन अतिशय थंड डोक्याने पाचही जणांचा जीव घेतल्याची कबुली दिली.
शंकर कुंभारे यांचा लहान मुलगा रोशन याचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील संघमित्रा गवई हिच्याशी डिसेंबर 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघेही पोस्टात नोकरीला होते. प्रेमविवाह मान्य न झाल्याने एप्रिल 2023 मध्ये संघमित्राच्या वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी संघमित्राने तिच्या सासरकडील सर्वांची अत्यंत थंड डोक्याने हत्या केली.










