Sukhdev Singh Gogamedi ची हत्या का? गँगस्टर रोहित गोदाराने केला खुलासा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sukhdev Singh Gogamedi news in marathi : Vaibhav, son of former Rajasthan Chief Minister Ashok Gehlot, was also involved in this case, claims by Gangster Rohit Godara.
Sukhdev Singh Gogamedi news in marathi : Vaibhav, son of former Rajasthan Chief Minister Ashok Gehlot, was also involved in this case, claims by Gangster Rohit Godara.
social share
google news

Rohit Godara News : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा गँगस्टर रोहित गोदारा याने एक नवीन फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने गोगामेडी यांच्या हत्येचे खरे कारण सांगितले आहे. त्याने असा दावा केला आहे की गोगामेडी यांच्याशी काही बाबींच्या वितरणाबाबत वाद झाला होता. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव याचाही या प्रकरणात सहभाग होता. यासोबतच त्याने लिहिले आहे की, या घटनेत मारल्या गेलेल्या नवीन सिंह शेखावत याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

ADVERTISEMENT

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रोहित गोदाराने लिहिले आहे, “सर्व भावांना राम राम, मी रोहित गोदारा कपूरीसर गोल्डी ब्रार आहे. तुम्हाला माहिती आहेच की, सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी आम्ही आधीच घेतली आहे. आपला भाऊ दिवंगत नवीन सिंह शेखावत जागीच शहीद झाला. जातीवादाच्या नावाखाली राजकारण करणार्‍या या बलात्कारी, अहंकारी आणि लोभी हरामखोराला मारताना आमच्या लाडक्या भावाचा बळी गेला आहे. त्याच्या धैर्याला आम्ही सलाम करतो. त्याचे कायम स्मरण ठेवू. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू.”

हेही वाचा >> केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या 10 खासदारांचे राजीनामे, कारण…

रोहित गोदाराने पुढे लिहिले की, “भावानों, त्याला (सुखदेव सिंह गोगामेडी) मारण्याचे कारण म्हणजे वितरणाच्या एका मुद्द्यावर त्याच्याशी आमची चर्चा झाली होती. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याने या प्रकरणात आम्हाला सहभागी करून घेतले होते. वैभव आमच्याकडून भाग घ्यायचा. सर्व खंडणीचा पैसा होता. याचा पुरावा आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंगमध्ये आहे. यासोबतच या प्रकरणाशी अनेक महत्त्वाची नावेही जोडली गेली आहेत. आम्ही हे शेअर करत आहोत कारण तो आमचा शत्रू सिद्धू मूसवालाच्या संपर्कात होता.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ‘नेहरूंनी 2 घोडचुका केल्या होत्या, एक तर…’, अमित शाहांच्या विधानानंतर प्रचंड गोंधळ

हत्येनंतर लिहिलं होतं, तिरडी तयार ठेव

गोगामेडीच्या हत्येनंतर रोहित गोदाराची एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्याने लिहिले होते, “सर्व भावांना, राम राम. मी रोहित गोदरा कपूरीसर, गोल्डी ब्रार आहे. बंधूंनो, आज सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही ही हत्या घडवून आणली आहे. भावांनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की, तो आपल्या शत्रूंना भेटायचा आणि त्यांना पाठिंबा देत असे. त्यांना बळ देण्याचे काम केले. शत्रूंनी त्यांच्या घराच्या दारात त्यांची तिकडी तयार ठेवावी. त्यांना लवकरच भेटू.”

सोशल मीडिया अॅपद्वारे गोदरा टोळीच्या कार्यकर्त्यांच्या होता संपर्कात

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर रोहित गोदारा हा बिकानेर जिल्ह्यातील लुंकरनसार येथील रहिवासी आहे. 2010 पासून ते गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहेत. किरकोळ गुन्हे करून तो लॉरेन्सच्या संपर्कात आला होता. यानंतर तो त्याच्या टोळीत सामील होऊन गुन्हेगारी कारवाया करू लागला. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याने तो बनावट पासपोर्ट बनवून २०२२ मध्ये दिल्लीतून दुबईला पळून गेला. तेथून तो सोशल मीडिया अॅप्सद्वारे टोळीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतो. परदेशातूनच सुपारी देतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT