धक्कादायक… मुंबईत सुटकेसमध्ये सापडला मुलीचा मृतदेह, कशी केली हत्या?
मुंबईतील कुर्ला येथे आज एक बेवारस सुटकेस पोलिसांना सापडली होती. ती उघडून पाहिल्यानंतर सुटकेसमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र मुलीविषयी कोणतीही माहिती मिळाली नसल्याने पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Crime: मुंबईमध्ये एका सुटकेसमध्ये मुलीचा मृतदेह (Girl Dead Body) सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य मुंबईतील कुर्ला (Kurla Mumbai) येथे मेट्रोचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी हा मृतदेह सापडला आहे. सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी (Mumbai Police) तपासाला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
रस्त्यावर सापडली बेवारस सुटकेस
शांतीनगर येथील सीएसटी रोडवर एक सुटकेस पडल्याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली होती. या ठिकाणी सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी सुटकेस सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येत सुटकेसची पाहणी करुन सुटकेस उघडल्यानंतर त्यामध्ये महिलेचा मृतदेह असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे.
हे ही वाचा >>Crime: प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टवरच प्रियकराने झाडली गोळी!
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पडलेल्या सुटकेची तपासणी करुन ती खोलण्यात आली. त्यानंतर ती उघडल्यानंतर 25 ते 35 वर्षाच्या महिलेचा मृतदेह त्या सुटकेसमध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी सांगितले की, फॉरेन्सिक तपासणीनंतरच त्या महिलेचे वय समजण्यास आपल्याला मदत होणार असल्याचे सांगितले. त्या महिलेने टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही पोलीस तपासत असून अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलं का?
ओळख पटवणं मोठं आव्हान
सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली आहे. मात्र कोणतेही धागेदोरे सापडले नसल्यामुळे आता महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यासाठी पोलिसांकडून ज्या ठिकाणी सुटकेस सापडली आहे. त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सध्या सुरु आहे.
हे ही वाचा >> Ind vs Aus : विश्व कप विजेत्या ऑस्ट्रेलियावर पडला पैशाचा पाऊस, टीम इंडियाला किती कोटी मिळाले?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT