Crime News: जमिनीवर पडलेला मृतदेह, मानेवर जखमेच्या खुणा अन्… नवविवाहितेच्या सासरी नेमकं काय घडलं?
लातूर जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणीचा मृतदेह तिच्या सासरच्या घरी आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणीचे लोदगा गावात 5 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
ADVERTISEMENT
Latur Crime News : लातूर (Latur) जिल्ह्यात एका नवविवाहित तरुणीचा मृतदेह तिच्या सासरच्या घरी आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणीचे लोदगा गावात 5 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मृत तरूणीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, ‘5 नोव्हेंबर रोजी त्यांना मुलीच्या सासरचा फोन आला की, त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे.’ (In Latur District newly married Woman Dead body on floor police investigate that it is murder or suicide)
ADVERTISEMENT
घटनास्थळी पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह जमिनीवर पडलेला पाहिला. तिच्या मानेवर दोरीच्या खुणा असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाचा : NCP : शरद पवारांची अचानक प्रकृती खालावली! डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला
सासरच्या घरी नवविवाहित तरूणीसोबत नेमकं काय घडलं?
पीडित कुटुंबीयांनी जावई सिद्धेश्वर भारती आणि सासू अरुणाबाई भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर मृत तरूणीचे पालक आक्रोष व्यक्त करत पोलिसांकडे न्यायाची याचना करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आजूबाजूच्या लोकांचे जबाब नोंदवले.
हे वाचलं का?
वाचा : Mumbra : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हायहोल्टेज ड्रामा, उद्धव ठाकरे स्वतः उतरले रस्त्यावर
पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला
पोलिसांनी सासरच्यांविरुद्ध कलम 306,498 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत तरूणीचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे. मुलीच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT