इमारतीवरून पडलेली सळई तरूणाच्या शरीराच्या गेली आरपार
Badalapur incidemt iron bar passed through body : बदलापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन इमारतीचे बांधकाचे सूरू असताना, वरून पडलेली सळई (iron bar) तरूणाच्या शरीराच्या आरपार गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Badalapur incidemt iron bar passed through body : बदलापूरातून (Badalapur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन इमारतीचे बांधकाचे सूरू असताना, वरून पडलेली सळई (iron bar) तरूणाच्या शरीराच्या आरपार गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर तरूण जमीनीवर बसून सळई आरपार गेल्याचा फोटो समोर आला होता. या 26 वर्षीय तरूणाचे नाव सत्यप्रकाश तिवारी आहे. हा प्रसंग पाहून कामगार वर्गात खळबळ माजली होती. या प्रकरणात तरूणाला रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या तरूणावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. (iron bar passed through body of the young man badlapur shocking incident)
ADVERTISEMENT
बदलापूर (Badalapur) पूर्वेच्या पनवेलकर हायवे लगत ठाणेकर पॅलेसिओ नावाच्या गृहप्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाच्या खाली रिलायन्स मार्ट सुरू होत आहे. शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या रिलायन्स मार्ट दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग करण्यासाठी सत्यप्रकाश तिवारी हा २६ वर्षीय कामगार आला होता. हा कामगार काम करत असताना त्याच्यासोबत मोठ्या अपघाताची घटना घडली.
हे ही वाचा : नातेवाईकासोबत अनैतिक संबंध, OYO हॉटेलमध्ये विवाहित महिलेसोबत घडली भयंकर गोष्ट
8 मजल्यावरून सळई कोसळली…
गृहप्रकल्पाचं बांधकाम सुरू असल्यामुळे आठव्या मजल्यावरून एक सळई (iron bar) अचानक खाली कोसळली होती. ही सळई थेट सत्यप्रकाश याच्या खांद्यात घुसली आणि पाठीतून आरपार बाहेर निघाली होती. या अपघातामुळे सत्यप्रकाश थेट जमिनीवर बसला होता आणि सळई त्याच्या आरपार गेली होती. या घटनेमुळे तिथे काम करत असलेल्या कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
हे वाचलं का?
यशस्वी शस्त्रक्रिया
या घटनेनंतर तत्काळ सत्यप्रकाश याला तातडीने गांधी चौकातील निर्मल हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करत त्याच्या पाठीत घुसलेली सळई काढली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही.
हे ही वाचा : तृतीयपंथी प्रियावरील प्रेम ठरलं जीवघेणं; हिंगोलीत तरुणाच्या हत्येनं खळबळ
या घटनेत ज्याप्रमाणे एक कामगार जखमी झाला होता, त्याप्रमाणे इतरही नागरीक जखमी होण्याची श्क्यता आहे. त्यामुळे विकासकाने बांधकाम होत असलेल्या ठिकाणी सरंक्षक जाळी बसवणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणतीही वस्तु खाली पडल्यास ती खाली असलेल्या व्यक्तीला इजा होणार नाही, असे नागरीकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ठाणेकर पॅलेसियो गृह प्रकल्पाचे विकासक अजय ठाणेकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT