मनोज सानेला होती सेक्सची चटक, म्हणून सरस्वतीला… फोनमध्ये सापडले पॉर्न Video

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj Sane was 'Sex Addict'; Big police revelation about 'dating app' and porn videos
Manoj Sane was 'Sex Addict'; Big police revelation about 'dating app' and porn videos
social share
google news

मुंबई: मीरारोड (Mira Road Murder) येथील लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) हिची हत्या करणाऱ्या मनोज सानेबाबत (Manoj Sane) आता अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. आतापर्यंत मनोज साने पोलिसांना असं सांगत होता की, सरस्वतीने आत्महत्या केली होती आणि त्यामुळे घाबरून त्याने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले. मात्र, हा जबाब तो दिशाभूल करण्यासाठी देत असल्याचं पोलीस सांगत आहेत. पण आता सरस्वतीच्या हत्येमागचं नेमकं कारण समोर आलं आहे. यामागे खरं कारण म्हणजे मनोज साने याला लैंगिक संबंधांचे व्यसन (Sex Addict) लागले होते. याच गोष्टीवरून सरस्वती आणि मनोजमध्ये झालेल्या वादातून मनोजने तिची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत. (manoj sane live in relationship saraswati vaidya murder sex addiction dating app porn website mobile)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज साने हा डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून काही महिला आणि मुलींच्या ताब्यात असल्याचं समोर आलं आहे. याच मुद्द्यावर सरस्वती आणि मनोज सानेमध्ये भांडण होऊन मनोजने तिची निर्घृण हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मनोज साने हा लैंगिक संबंधांच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो सातत्याने अश्लील वेबसाइटवर सर्फिंग करत असल्याचेही आता पोलीस तपासात उघड झाले आहे.

हे ही वाचा >> किचनमधली दृश्य पाहून पोलिसांचीही तंतरली, मीरा रोड हत्याकांडाची FIR जशीच्या तशी!

सुरुवातीला मनोज साने हा डेटिंग अ‍ॅप्सवर सक्रिय होता. त्याच माध्यमातून अनेक तरुणींच्या तो संपर्कात होता. जेव्हा ही गोष्ट सरस्वती वैद्य हिला समजली तेव्हा ती प्रचंड चिडली. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये वादही झाला. ज्या वादातून मनोजने सरस्वतीची हत्या केली. याशिवाय मनोजचा मोबाइलही पोलिसांनी ताब्यात घेतला असून यामध्ये अनेक अश्लील फोटोही सापडले आहेत.

हे वाचलं का?

मनोज साने खरंच HIV पॉझिटिव्ह?

दरम्यान, आरोपी मनोज सानेने तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा मुद्दा देखील पुढे करून एक नवा डाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने असंही म्हटलं की, त्याने सरस्वतीशी कधीच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांनी या सगळ्याबाबत मुंबई Tak शी बोलताना सांगितलं की, मनोज साने जे दावे करत आहे त्यावर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही

सरस्वती वैद्यच्या हत्येचं नेमकं प्रकरण काय?

  • बुधवार (7 जून) सायंकाळी पोलिसांचे पथक अचानक मीरा रोडवरील गीता आकाश दीप सोसायटीत पोहोचले आणि थेट सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटजवळ गेले जिथून प्रचंड दुर्गंधी येत होती. जेव्हा पोलीस या फ्लॅटजवळ पोहचले तेव्हा त्यांना देखील प्रचंड धक्का बसला, कारण दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरणाबाबत त्यांनी मीडियामध्ये जे काही वाचले आणि ऐकले तेच त्यांना मीरारोडमध्ये पाहायला मिळालं होतं.
  • यावेळी पोलिसांना फ्लॅटमधून महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. सरस्वती वैद्य (वय 36 वर्ष) (Saraswati Vaidya) असे या महिलेचे नाव आहे. यावेळी पोलिसांना घरातच झाडे तोडण्यासाठी वापरलेला कटरही पोलिसांना यावेळी सापडला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ 56 वर्षीय आरोपी मनोज साने याला अटक केली. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता यातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
  • चौकशीवेळी मनोजने पोलिसांना असं सांगितलं की, त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वती हिने काही कारणाने आत्महत्या केली होती. जेव्हा तो घरी परतला तेव्हा सरस्वतीचा मृतदेह पाहून तो प्रचंड घाबरला. यावेळी त्याने श्रध्दा वाळकर खून प्रकरणाबाबत बरेच काही ऐकले होते. तीच गोष्ट लक्षात घेऊन त्याने मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा विचार केला.

हे ही वाचा >> Mira Road Murder : रेशन दुकानात भेट अन् क्रूर शेवट! झोप उडवणाऱ्या हत्येची Inside Story

  • मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने मृतदेह कापण्यासाठी बाजारातून झाड कापण्याचं कटर आणलं होतं. तो तीन दिवस घरात आपल्या सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करत होता. आरोपींनी मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. मृत शरीरातून दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून कुकरमधून उकळून घेतले होते. यावेळी त्याने हाडे, मांस आणि रक्त वेगळे केलं होतं. यावेळी मनोजन मृतदेहाचे काही तुकडे उकळून कुत्र्यांनाही खाऊ घातल्याचे सांगितले जात आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किचनजवळ हिरव्या आणि काळ्या रंगाच्या बादल्या ठेवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये रक्त भरलेलं होतं. तसेच मृतदेहाचे छोटे तुकडे करून त्या बादल्यामध्ये ठेवण्यात आले होते. तसंच एका खोलीत मृत महिलेचे केसही आढळून आले. तसेच खोलीत अनेक काळ्या पिशव्या देखील आढळून आल्या. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून आता ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पुढील तपासासाठी फ्लॅट क्रमांक 704 सील करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT