मुलुंडमधील भयंकर घटना! आईच्या ओळखीने आधी घरात आला, नंतर मुलीला एकटं बघून…
मुलुंडमध्ये आईबरोबर ओळख असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन एक तरुणाने आपल्या मित्राला बोलवून घेत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी एकाला अटक केली असून एकजण फरार आहे. अल्पवयीन मुलीला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
मुंबई: मुलुंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 15 वर्षाच्या मुलीवर दोघांकडून सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेतील धक्कादायक बाब ही आहे की, या दोघांमधील एका आरोपीची ओळख मुलीच्या आईबरोबर होती. त्याने त्याचा फायदा घेत आपल्या मित्राला मुलीच्या घरी बोलवून घेत दोघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार (Gang Rape) केला. मुलीला गुंगीचे पेय देऊन ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर दोघांनी अत्याचार केला आहे. या घटनेची माहिती मुलीच्या आईला समजताच त्यांनी त्या दोघांविरोधात मुलुंड पोलिसात (Mulund Police) गुन्हा दाखल केला आहे. (mumbai crime mulund minor girl gang-raped by two case registered case mulund police)
ADVERTISEMENT
आईच्या ओळखीचा फायदा
ज्या अल्पवयीन अत्याचार करण्यात आला आहे. त्या मुलीची आई आणि त्या दोघांमधील एकाची आईबरोबर ओळख होती. त्या ओळखीचा फायदा घेत मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला आहे. मुलीची आई नसताना मुलीवर अत्याचार करुन तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
हे ही वाचा >> Mulund : मराठी महिलेला ऑफिससाठी नाकारली जागा, पिता-पुत्राविरुद्ध पोलिसांची ‘अॅक्शन’
मुलीला जीवे मारण्याची धमकी
मुलीची आई घरी नसताना मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. मुलीला जीवे मारण्याची धमकी देत असल्याने अल्पवयीन मुलीनेही ही घटना आईला सांगितली नाही. मात्र मुलीला त्रास होऊ लागल्याने आईने तिला रुग्णालयात घेऊन गेली. त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याची स्पष्ट झाले. ही घटना आईला समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. त्यानंतर ही घडलेली घटना मुलीने आपल्या आईला सांगितली.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Manipur violence : मणिपूर पुन्हा पेटलं! लोकांनी भाजपचं कार्यालयाच जाळलं
एकाला अटक, दुसरा फरार
मुलीने ही घटना आईला सांगितल्यानंतर पीडितेच्या आईने मुलुंड पोलिसात ओळखीच्या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या दोघांमधील 21 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. तर त्याच दुसरा साथीदार पसार झाला आहे. फरार असलेल्या तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीच्या शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT