Nanded Crime : करणने घरातल्या साडीने घोटला अर्जूनचा गळा, कारण ठरला मोबाईल
नांदेडमध्ये भावानेच भावाची हत्या केली. मोबाईल देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर अर्जूनने करणची हत्या केली.
ADVERTISEMENT
Nanded Crime News Today : मोबाईलमुळे कधी कुणी आत्महत्या करतयं, तर कुणी कुठलातरी अपराध. नांदेडमध्येही अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडलीये. मोबाईलमुळे भावाने भावाचाच साडीने गळा आवळून जीव घेतला. नांदेड शहराला लागून असलेल्या गोपाळ चावडी गावात ही घटना घडलीये. (Brother killed his brother in Nanded over disputes of mobile)
ADVERTISEMENT
नांदेड शहराजवळच गोपाळ चावडी नावाचं गाव आहे. अर्जून राजू गवळे या तरुणाची त्याचाच भाऊ करण राजू गवळेने हत्या केली. घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोठ्या भावाला अटक केली आहे.
हेही वाचा >> भाजपच्या सापळ्यात विरोधक अडकणार?, समान नागरी कायद्यामुळे झालाय ‘गेम’
गोपाळ चावडी येथील अर्जून गवळे आणि करण गवळे हे दोघे भाऊ. दोघांमध्ये रविवारी मध्यरात्री अचानक वाद सुरू झाला. वादाचं कारण होतं मोबाईल. अर्जूनने मोबाईल मागितला, पण करणने अर्जूनला मोबाईल दिला नाही. मोबाईल करणचा असल्याने त्याने द्यायला नकार दिला.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?
वाद झाला अन्…
करण मोबाईल देत नसल्याने अर्जून आक्रमक झाला. त्यानंतर करण आणि अर्जूनमधील वाद वाढला. दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. संताप अनावर झालेल्या अर्जूनने 20 वर्षांच्या मोठ्या भावाची म्हणजे करणचा घरात पडलेल्या साडीने गळा आवळला. करणने अर्जूनचा जीव जाईपर्यंत सोडलंच नाही. तो जागेवरच गतप्राण झाला.
हेही वाचा >> PUNE: दर्शना पवारच्या हत्येसाठी नराधम राहुलने राजगड आणि सोमवारच का निवडला?
पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली. पोलिसांनी मयत करणचे काका लक्ष्मण मालोजी वाघमारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर अर्जूनला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT