सांगलीत क्रूरतेचा कळस! …अन् त्याने बापालाच ट्रॅक्टरखाली चिरडून मारले
सांगली जिल्ह्यातील बेडग येथे मुलाने बापाची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
Sangali Crime News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असलेल्या बेडगमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण जिल्हाच हादरला आहे. एका मुलाने क्रूरतेचा कळस गाठत जन्मदात्या बापालाच संपवलं. बापाची हत्या करण्याचं कारण समोर आलं असून, याप्रकरणात मिरज ग्रामीण पोलिसांनी मयत व्यक्तीच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
बेडगमधील या घटनेची सांगली जिल्ह्यात सध्या चर्चा होत आहे. मुलाने बापाची हत्या का केली, याबद्दलची काही माहिती आता समोर आली आहे.
बापलेकामधील वाद काय?
मिळालेल्या माहितीनुसार बेडग येथे मालगाव रोड उपार वस्ती येथे दादासो गणपती आकळे यांचे राहते घर व शेती आहे. त्यांचे तीन विवाह झाले होते. आकळे यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
हे वाचलं का?
क्राईम न्यूज >> Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार
त्यानंतर दादासो आकळे यांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीनेही पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पुढे त्यांनी तिसरं लग्न केलं. तिसऱ्या पत्नीपासून त्यांना एक अपत्य असल्याची माहिती आहे.
दरम्यान, संशयित लक्ष्मण आकळे आणि त्याचे वडील दादासो आकळे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पैसे आणि जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता. मुलगा लक्ष्मण आकळे हा वडील दादासो आकळे यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता. तसेच जमीन नावावर करण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता.
ADVERTISEMENT
क्राईम न्यूज >> Rape Case: 17 वर्षाच्या वासनांध मुलीचा 2 अल्पवयीन मुलांवर बलात्कार, मुलीची आईही…
पैसे देण्यास तसेच जमीन नावावर करून देण्यास दादासो आकळे यांच्याकडून विरोध होता. वडील नकार देत असल्याने मुलगा लक्ष्मण याच्या मनात राग होता. बुधवारी (24 मे) सकाळी आकळे हे कामानिमित्त जात असताना त्यांना संशयिताने ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारले.
ADVERTISEMENT
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटना स्थळी पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात वडिलांच्या खून प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT