गोष्ट एका सायनाईड जॉलीची! 14 वर्षात एकाच घरातील 6 हत्या, नेमकं प्रकरण होतं काय?
केरळमधील कोझिकोडमधील ही एका कुटुंबाची कहाणी जिथे 14 वर्षांतच 6 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांना कोणताही आजार नव्हता. 17 वर्षांनंतर जेव्हा या 6 मृत्यूचे सत्य समोर आले तेव्हा मात्र सारेच हादरुन गेले होते.
ADVERTISEMENT
Cyanide jolly : केरळमधील कोझिकोडमधील पोन्नमट्टम (Kozhikode Ponnamattam) परिसरात थॉमस कुटुंब (Thomas family) येथे राहत होते. त्यावेळी हे कुटुंब म्हणजे समृद्ध आणि श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जात होते. या कुटुंबाचा प्रमुख टॉम थॉमस होता.तर त्यांच्या पत्नीचे नाव अनम्मा थॉमस होते. या जोडप्याला दोन मुलगे होते. रॉय थॉमस आणि रोजो थॉमस. 1997 मध्ये रॉयचा विवाह जॉली अम्मा जोसेफशी (Jolly Amma Joseph) झाला होता. त्या लग्नानंतर जॉली अल्पावधीतच सर्वांची लाडकी झाली. तिने कुटुंबाची खूप चांगली काळजी घेत आपल्या वाणीने सगळ्यांना एकत्र ठेवली.(story of cyanide jolly 6 murders in the same house in 14 years was it a real case)
ADVERTISEMENT
लग्नानंतर नोकरीचं नाटक
जॉलीचं रॉयशी लग्न झालं तेव्हा त्याला कोणतीही नोकरी नव्हती. वडील टॉम थॉमस यांच्याकडून घरखर्चासाठी पैसे घेत होता. त्यामुळे जॉलीने आपला अभ्यास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून भविष्यात नोकरी मिळेल ही अशा होती. शकेल. लग्नानंतर काही काळानंतर, त्याने आपल्या घरच्यांना सांगितले की, त्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कालिकत येथे नोकरी मिळाली आहे. त्यानंतर 2002 मध्ये जॉलीची सासू अन्नम्मा यांची तब्येत अचानक बिघडली, आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथील उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. 22 ऑगस्ट 2002 रोजी घरी येऊन फक्त दोन महिने उलटले होते. मात्र अन्नम्माची तब्येत पुन्हा बिघडली, आण त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूचे खरे कारण
त्यावेळी त्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीही मृत्यूचे खरे कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांनी कुटुंबीयांना पोस्टमार्टम करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यावेळी कुटुंबीयांनी पोस्टमार्टम करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी अन्नम्मावर अंत्यसंस्कारही केले. कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंब दु:खात गेले. पण वेळ निघून गेला आणि कुटुंबाचे आयुष्य पुन्हा रुळावर आले. त्यानंतर 26 ऑगस्ट 2008 रोजी अन्नम्माची 6 वी पुण्यतिथी 4 दिवस आधीच करण्यात आली. त्या कार्यक्रमाला इतर नातेवाईकही उपस्थित होते. मात्र त्यानंतर 26 ऑगस्ट रोजीच टॉम थॉमसचा अचानक मृत्यू झाला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Gadchiroli: कुंभारे कुटुंबाला सुनेने ‘या’ विषाचा भरवला घास, ‘यासाठी’ काढला काटा!
मालमत्तेची विभागणी
टॉम थॉमसचा मृत्यूचे कारणही हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. यावेळीही कुटुंबीयांनी टॉमचा मृत्यूचे शवविच्छेदन न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 6 वर्षांत कुटुंबातील दुसरा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंब विभक्त होत त्यांच्या मालमत्तेची विभागणी झाली आणि ते विभक्त राहू लागले.
तीन वर्षांनंतर आणखी एक मृत्यू
थॉमस कुटुंबाच्या आयुष्यात 9 सप्टेंबर 2011 हा एक दिवस होता. त्या दिवशी जॉलीचा नवरा रॉय थॉमस यांचे अचानक निधन झाले. रॉय यांचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला होता. त्यावेळी मात्र कुटुंबातील एका सदस्याच्या सांगणयावरुन रॉयचे शवविच्छेदन करण्यात आले. सायनाइडच्या विषामुळे रॉय यांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणाचा तपास वाढवला असता रॉय हे आर्थिक संकटाशी झुंजत असल्याचे त्यावेळी समोर आले. त्याच कारणावरून त्याने आत्महत्या केली. हे रॉय यांच्या पत्नीने म्हणजेच जॉलीने स्वतः पोलिसांना सांगितले होते. त्यावेळी पोलिसांनीही जॉलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Vinayak Mete Nephew: दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या, नेमकं कारण काय?
लोकांनी तर्कवितर्क लढवले
त्यानंतर थॉमस कुटुंबीयांना 24 फेब्रुवारी 2014 रोजी आणखी एक धक्का बसला. त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मॅथ्यू मंजाडियाल यांचाही असाच मृत्यू झाला. तो अन्नम्मा थॉमसचा भाऊ होता. मात्र कुटुंबीयांनी त्याचे शवविच्छेदन न करता त्याच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबात एकामागून एक मृत्यू होत होते. मात्र त्याचा का होत होते ते समजत नव्हते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी वाटेल ते तर्कवितर्क लढवायला चालू केले होते. असंही म्हटले जात होते की, त्यांना कोणाचा तरी शाप लागला आहे.
ADVERTISEMENT
14 वर्षात 6 जणांचा मृत्यू
एकामागून एक मृत्यू होत असतानाच मॅथ्यूच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी रॉय थॉमसचा चुलत भाऊ साजू थॉमसची मुलगी अल्फिन हिचाही मृत्यू झाला. मृत्यूसमयी अल्फिन फक्त दोन वर्षांची होती. हा मृत्यूही अचानक झाला होता. त्यानंतर 11 जानेवारी 2016 रोजी अल्फिनची आई सिली साखरियास यांचेही निधन झाले. म्हणजेच 14 वर्षात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला होता. एवढेच नाही तर एकाच कुटुंबातील दोन दूरच्या नातेवाईकांचाही अपघातात मृत्यू झाला. सिलीच्या मृत्यूनंतर जॉली आणि साजूचे लग्न झाले. त्यामुळे ती त्याच्यासोबत राहू लागली होती.
जॉलीने गेम केला
त्यानंतर कुटुंबातील एकाने अचानक पोलिसांची मदत मागून या सर्वांचा तपास करण्याची मागणी केली.मागणी करणारा होता टॉमचा धाकटा मुलगा रोजो थॉमस. त्याचे म्हणणे होते की, 6 मृत्यू हा केवळ योगायोग नसून कोणीतरी कट करुन हे रचले आहे. रोजो अमेरिकेत नोकरी करत असे. मात्र या सर्व मृत्यूमागे आपल्या मेहुणीचा म्हणजेच जॉलीचा हात असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे या 6 मृत्यूंचा तपास करण्याची विनंती त्यांनी पोलिसांना केली होती. सुरुवातीला पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. मात्र काही गोष्टी सांगितल्यामुळे पोलिसही नंतर चक्रावले गेले.
एकालाही सोडलं नाही
रोजोने सांगितले की, तिच्या वहिनीने कुटुंबाला खोटे सांगितले की ती एनआयटी कालिकतमध्ये काम करत आहे म्हणून. कारण नोकरीतील तिचे ओळखपत्रही खोटे निघाले होते. त्याच बरोबर मृत्यू झालेल्या 6 जणांजवळ फक्त जॉलीच होती. हे रोजोने पोलिसांना सांगितले. त्यानंतर रोजोच्या म्हणण्याप्रमाणे पोलिसांनी तिच्याविरुद्धात गुन्हा दाखल केला. एवढेच नाही तर स्मशानभूमीतून पुरलेले 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले. आणि शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये 5 मृत्यू सायनाइडमुळे तर 2 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
जॉलीने गुन्ह्याची कबुली दिली
पोलिसांनी जॉलीला 5 ऑक्टोबर 2019 रोजी पुन्हा अटक केली. आधी जॉली त्यांची दिशाभूल करत होती. मात्र चौकशी केल्यानंतर मात्र जॉलीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर तिने अचंबित करणाऱ्या अनेक गोष्टी तिने सांगितल्या. तिने घरचा सर्व हिशेब ठेवल्याने सासूची हत्या केल्याचे सांगितले. मालमत्तेचा प्रश्न उपस्थित सुरु झाल्यावर मात्र जॉलीने हत्या करण्याचे सत्र चालूच ठेवले.
पतीही दारुच्या नशेत
पतीही दारूच्या नशेत नेहमी असायचा त्यामुळे त्याच्याबरोबरही तिचा वाद होत होता. त्यामुळे जॉलीने त्यालाही ठार केले. दरम्यान, तिला तिच्या पतीचा चुलत भाऊ म्हणजेच साजू थॉमस आवडला होता. मात्र त्याचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे तिला साजू गमवायचा नव्हता. त्यामुळे त्याने साजूची पत्नी आणि मुलीची हत्या केली. तर त्याचवेळी त्याच वेळी तिने मॅथ्यूचीही हत्या केली. कारण रॉयच्या मृत्यूनंतर मॅथ्यूच पोस्टमॉर्टम करण्याचा आग्रह धरत होता. त्यामुळे पोलिसांनी नंतर रॉयचा चुलत भाऊ साजूलाही अटक केली. त्याचाही 6 हत्या करण्यामध्ये त्याचा सहभाग होता. कारण त्याने पत्नी आणि मुलीच्या मृत्यूनंतर जॉलीबरोबर लग्न केले होते. त्यावेळी पोलिसांनी तापस करुन या सर्व प्रकरणात जॉलीचाच हात असल्याचे सिद्ध केले.
सायनाइडचे अंश
या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केला असता तर जॉलीला एमएस मॅथ्यूने सायनाईड पुरवले होते हे सिद्ध झाले असते. मॅथ्यूला त्याच्या मित्राने सायनाइड दिले होते. कारण तो दागिन्यांच्या दुकानात काम करत होता. तेथे सायनाइडचा वापर सोने आणि चांदी स्वच्छ करण्यासाठी केला जात होता. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी 1800 पानांचे आरोपपत्र तयार करून न्यायालयात सादर करण्यात आले आणि जॉली देशात सायनाइड जॉली या नावाने प्रसिद्ध झाली. सध्या जॉली तुरुंगात आहे, मात्र फेब्रुवारी 2023 मध्ये फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर 6 मृतदेहांपैकी 4 मृतदेहांमध्ये सायनाइडचे कोणतेही अंश सापडले नव्हते. तरीही जॉलीली शिक्षा झाली कारण मृत्यूच्या इतक्या वर्षानंतरही सायनाइडचे अंश शरीरात राहिले नसण्याची शक्यता आहे असं न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतरही जॉलीने आपला गुन्हा कबूल केला होता त्यामुळे ती तुरुंगातच राहिली.
हे ही वाचा >>फीसाठी पैसे नाही म्हणून विद्यार्थ्यांची आत्महत्या, जरांगे-पाटलाच्या सभेला लावलेली हजेरी!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT