Abhishek Ghosalkar: बलात्कार, मॉरिस भाई अन् दाऊद गँग.. हादरवून टाकणारी Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

मॉरिस आणि दाऊदचे काय संबंध?
मॉरिस आणि दाऊदचे काय संबंध?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिषेक घोसाळकर हत्ये प्रकरणी नवी माहिती

point

मॉरिसने महिलेवर केलेला बलात्कार

point

मॉरिस आणि दाऊद गँगचा काय संबंध?

Abhishek Ghosalkar murder case Mauris Bhai: मुंबई: ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आता बरीच नवनवीन आणि हादरवून टाकणारी अशी माहिती आता समोर येत आहे. अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करणारा मृत आरोपी मॉरिस हा गुन्हेगारीचा प्रवृत्तीचा असल्याचं हे समोर आल्यानंतर आता त्याच्याविषयी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (abhishek ghosalkar murder case rape  mauris noronha bhai and dawood gang shocking inside story)

ADVERTISEMENT

एका महिलेने बलात्काराची तक्रार मॉरिसविरोधात दाखल केली होती. पण तिला अभिषेक घोसाळकर यांची फूस होती असा मॉरिसचा समज झालेला आणि त्यातूनच त्याने घोसाळकर यांची हत्या केली. पण आता या सगळ्याबाबत स्वत: पीडित महिलेने पोलिसात तिचा जबाब नोंदवला आहे. 

पण या जबाबात तिने एक अत्यंत गंभीर असा आरोप केला आहे. मॉरिस याचे कुप्रसिद्ध दाऊद गँगशी संबंध होते आणि त्याचीच धमकी देत मॉरिसने तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. तसेच तिच्या पतीला देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण धक्कादायक बाब ही आहे की, आपल्या जबाबात महिलेने कुठेही अभिषेक घोसाळकर यांचा उल्लेख केलेला नाही.

हे वाचलं का?

दाऊद गँगची धमकी, वारंवार बलात्कार अन्... महिलेनी नोंदवली FIR जशीच्या तशी

दिनांक 07/06/2022 मी (अबक) वय 48 वर्षे व्यवसाय गृहीणी रा. मुंबई.. समक्ष पोलीस स्टेशन येथे येवुन  सांगते की, मी वरील ठिकाणी माझे पती, सासु असे एकत्रित राहत असुन मी सध्या घरीच असते. माझे पती रिअल इस्टेटमध्ये रिडेव्हलपमेंटचे काम करुन आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. मी सन 2014 ते सन 2016 या वर्षामध्ये चांगल्या पगारावर नोकरी करीत होती. सन 2016 मध्ये मी नोकरीचा राजीनामा दिला व माझे पतीही चांगल्या पगारावर नोकरी करीत होते. सन 2008 रोजी त्यांनीदेखील त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला व फिटनेस ट्रेनिंग देण्याचे काम काही वर्षे केले. मी व माझे पती यांनी आमच्या दोघांची नावावर असलेली सदनिका विकली व आलेल्या पैशांतून आम्ही पुण्यात जमीन खरेदी केली. 

माझे पती फिटनेस सल्लागार म्हणून वेगवेगळ्या व्यक्तिंना व्यावसायिक शिक्षण देत होते. त्या मिळणाऱ्या मोबदल्यापासून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत होते. तसेच ते स्वतःच्या फिटनेससाठी जिममध्ये व्यायामासाठी जात होते. त्यांच्याबरोबर मी देखील जात असे. सन 2014 मध्ये मी आणि माझे पती असे पुणे येथील खरेदी केलेली जमीन विकण्याच्या प्रयत्नात होतो त्याची माहिती जिममधील आमच्या मित्र-मैत्रिणींना होती. माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा नावाचा इसम देखील आम्ही जात असलेल्या जिममध्ये व्यायाम करण्यासाठी यायचा. त्याने मला व माझ्या पतीला स्वतःहून संपर्क साधला व आमच्याशी ओळख झाल्याने त्याने माझ्या पतीस जमीन विक्रीतून मिळत असलेल्या पैशांचे काय इन्व्हेस्टमेंट करणार आहे व तुम्हाला जमीन विक्रीतून अंदाजे 1 करोड रुपये येणार आहेत हे खरे आहे का? असे म्हणुन विचारणा केली 

ADVERTISEMENT

तेव्हा माझ्या पतीने मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा यास सांगितले की सदर जमीन विक्रीचा व्यवहार पूर्ण झालेला नाही. पण मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा यास सांगूनही तो नित्यनियमाने माझा व माझ्या पतीशी संबंध वाढवू लागला व मैत्री करण्याचा प्रयत्न करु लागला व या ना त्या कारणाने आम्हा दोघांना सदर जमीन विक्रीबाबतची माहिती विचारु लागला. मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याने मी व्यायाम करीत असलेल्या जिममध्ये माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लागला व माझ्याबद्दलची जिममध्ये असलेली माहिती काढून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या व मला सन 2014 मध्ये महागड्या कंपनीचा मोबाईल फोन गिफ्ट दिला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> आधी सुरू केलं Facebook Live, नंतर झाडल्या धाडधाड गोळ्या

ही घटना माझ्या पतीलाही माहित होती त्यानंतर कोणतेही निमित्त काढुन माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा हा आमच्या कुटूंबाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन एक चांगला व्यक्ति असल्याचा भासवू लागला. मी व माझ्या पतीने जुलै 2014 रोजी पुणे येथील विकलेल्या जमिनीच्या व्यवहाराची माहिती त्याला कळाली व तेंव्हा त्याने सदर व्यवहारातून किती रक्कम मिळाली असे माझ्या पतींला विचारले असता त्यांनी 1 कोटी 50 लाख रुपये 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत मिळणार आहेत असे मॉरिसला सांगितले. जमीनीच्या विक्री व खरेदीचा व्यवहार हा एका कंपनीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे असे सांगितले. आमचा जमीन विक्रीबाबतचा व्यवहार त्याला कळल्यानंतर मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याने आमची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देषाने आम्हास सांगितले की त्याचे  एक सलून दुकान असून नमूद व्यवसायाव्दारे त्याच्याकडे परदेशी सौंदर्य प्रसाधने वितरीत करण्याचे पेटंट हक्क आहेत. 

त्या व्यवसायामध्ये त्याला 200 ते 300 टक्के नफा मिळत आहे व त्याकरिता बऱ्याच लोकांनी त्याच्या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक केलेली आहे व तो त्यांच्या मोबदल्यात त्यांना गुंतवणूकीच्या 3 टक्के परतावा देत आहे असे सांगितले त्यानंतर काही दिवसांनी माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याने माझ्या पतीच्या एका जुने मित्राशी आमची ओळख करुन दिली. त्या मित्राने आम्हाला असे सांगितले की त्यांनी देखील जुलै 2014 मध्ये 20 लाख रकमेची गुंतवणूक मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याच्याकडे केली आहे व माँरीस क्विंटीन ऑलिव्ह नरोन्हा हा त्यास गुंतवणूक केलेल्या रकमेचे दरमहा 3 टक्के व्याजाच्या दराने रक्कम देत आहे व आतापर्यंत त्याने कधीही व्याज देण्यामध्ये चुकारपणा केलेला नाही. 

त्याच्या सांगण्यावर आमचा ठाम विश्वास निर्माण झाला आणि त्या विश्वासाखातर मी व माझ्या पतीचे (Joint Account) असलेल्या बँके खात्यातून धनादेशव्दारे रोख रक्कम काढून मी व माझ्या पतीने मॉरीस क्विटीन ऑलिव्हर नरोन्हा यास सुपुर्द केली. त्याचा तपशील खालीलप्रमाणे (1) तारीख - 04/09/2014- रक्कम - 20,00,000/-, (2) तारीख- 20/11/2014 रक्कम - 25,00,000/-, (3) तारीख- 25/11/2014- रक्कम 18,00,000/-, (4) तारीख - 04/02/2015- रक्कम - 25,00,000/- एकूण रक्कम 88,00,000/- सदर एकुण रक्कम 88,00,000/- रुपये इतकी रक्कम माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा यास दिली. 

त्यानंतर बचत खात्यावर प्रथम महिन्याचा गुंतवणूक परतावा म्हणून आमच्या गुंतवणुक केलेल्या रकमेवर 3 टक्के दराने दिनांक 24.03.2015 रोजी रुपये 1,64,000/- आणि 1,00,000/- असे एकत्रित रुपये 2,64,000/- रक्कम आमच्या बँकेच्या (Joint Account) असलेल्या खात्यात जमा केले. 
एप्रिल 2015 च्या दुस-या आठवडयात साधारण 6 एप्रिल 2015 रोजी मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याने मला व माझ्या पतीस त्याच्या राहत्या घराजवळ बोलावले आणि सांगितले की, तुम्हाला मी 3 टक्के गुंतवणूक परतावा धनादेशाव्दारे बँक खात्यात दिले आहेत.

तो बँकेच्या वैध व्यवहारातर्फे दिला आहे परंतू तुमची गुंतवणूक रक्कम ही मी रोख स्वरुपात घेतली आहे त्यामुळे तुम्हाला आयकर विभागातर्फे नोटीस येऊन तुम्हाला आयकर भरावा लागेल. त्यामुळे त्याने आम्हाला सांगितले की, तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेवर ज्या व्याजाची रक्कम आहे ती मी धनादेशाव्दारे तुमच्या खात्यामध्ये जमा आहे. त्या गुंतवणूकीच्या व्याजाचा परतावा रक्कम रु.2,64,000/- तसेच आयकर भरण्याकरिता रु. 20,000/- अशी एकुण रक्कम रुपये 2,84,0000/- धनादेशाव्दारे माझ्या खात्यात जमा करावी जेणेकरून भविष्यात एकमेकास आयकर विभागाच्या माध्यमातून कोणताही त्रास होणार नाही असे म्हणाला व त्यानंतर माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोव्हा याने आम्हास वरील परतावा रक्कम रुपये 2,64,000/- ही रक्कम रोख स्वरुपात मला देण्यात येईल असे आश्वासन दिले. 

हे ही वाचा>> ठाकरेंनी गमावला ढाण्या वाघ.. अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू

त्यामुळे आम्ही दिनांक 08.04.2015 रोजी आमच्या कार्पोरेशन बँकेच्या वरील बचत खात्यातून 2,84,000/- रक्कम चेकव्दारे माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याच्या खात्यात धनादेशाव्दारे जमा केली. त्यानंतर मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याने 10.04.2015 रोजी रोख रक्कम 2,64,000/- आमच्या राहत्या घरी येऊन स्वतः दिली. अशा प्रकारे माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याने आम्हास गुंतवणूक परतावा म्हणून त्याच्या व्यवसायात गुंतवणूक केलेल्या रक्कम रुपये 88 लाख यावर 3 टक्के गुंतवणूक परतावा रुपये 2,64,000/- रोख स्वरुपात नमुद कालावधीत दिला. सदर व्यवहार सुरळीत झाल्यामुळे मला व माझ्या पतीस मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हाबद्दल फसवणूकीचा कोणताही संशय आला नाही. परंतू माहे मे 2015 रोजीचे गुंतवणूक केलेल्या रकमेचे व्याज माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याच्याकडून येणे जरुरीचे होते परंतू ठरल्याप्रमाणे व्याजाची रक्कम रोख किंवा धनादेशव्दारे आम्हाला मिळालेली नाही व मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा यास संपर्क केला असता त्याने सांगितले की, सौंदर्य प्रसाधने व्यवसायात जास्त वृध्दी नसल्याने व व्यवसायात अचानक  आलेल्या मंदीमुळे तो व्याज देऊ शकत नाही. पण 3 महिन्यांनंतर मी व्याजाची रक्कम एकत्रितपणे अदा करेन असे सांगितले. परंतू 3 महिन्यांनंतरही आम्हांस गुंतवणूकीच्या व्याजाचा परतावा न मिळाल्याने आम्ही त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा हा वेळोवेळी टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे देउन आज देतो उदया देतो अशी खोटी आश्वासने देत होता व सांगत होता की आपण केलेल्या गुंतवणीकीची रक्कम व त्यावरील व्याज परतावा सुरक्षित असून काही दिवसानंतर तो देईल अशी खात्री देत होता. 

सदर घटनेमुळे आम्ही गुंतवलेली सर्व रक्कम माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याच्याकडे अडकून पडल्याने मी व माझे पती पूर्णपणे मानसिक तणावाखाली जगत होतो. त्यानंतर दिनांक 14 मार्च 2018 रोजी माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याने मला माझ्या मोबाइलवर संपर्क साधून मला म्हणाला की तुमच्या गुंतवणूकीची व व्याजाची रक्कम घेऊन जाण्यासाठी व पुढील गुंतवणूकीची चर्चा करण्यासाठी माझ्या घरी एकटी ये असे म्हणाल्याने मी त्याच्यावर विश्वास ठेवुन त्याच्या राहत्या घरी येथे आम्ही गुंतवणूक केलेली रक्कम व व्याजाचा परतावा आम्हास परत मिळेल या आशेने माँरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा याच्या राहत्या घरी दुपारी 1.30 वा. एकटी गेले. त्याच्या घरात माँरीस याच्याव्यतिरिक्त इतर कोणीही उपस्थित नव्हते. मी तेथे असलेल्या सोफ्यावर बसल्यानंतर मॉरीसने कोल्ड्रीक्सचा ग्लास आणून माझ्या शेजारी ठेवले व तो देखील माझ्या शेजारी बसला. त्याने मला सांगितले की तु व तुझ्या पतीने माझ्यासोबत केलेल्या आर्थिक गुंतवणूक व्यवहाराबाबत काळजी करायची आवश्यकता नाही व आर्थिक गुंतवणूकीसाठी त्याने घेतलेले सर्व पैसे मी परत देईल असे आश्वासन देऊ लागला. परंतू मी विचारल्यानंतर मॉरीस हा गुंतवणूकीची रक्कम व त्यावरील व्याजाचा परतावा किती कालावधीत अवधीत देईल याबाबत तो काहीही बोलत नव्हता.

त्यानंतर तो मला म्हणाला की तु मला खूप आवडते असे म्हणुन त्याने घातलेले टी-शर्ट व इतर कपडे काढले आणि अर्धनग्न अवस्थेत माझ्याजवळ येवुन माझ्या शरीरावर व गालावर हात फिरवू लागला व माझ्या जवळ बसुन मला काही कळायच्या आत त्याने त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने सेल्फीव्दारे फोटो काढला व मी त्यास मला असे आवडत नाही व त्याला विरोध केला तेव्हा त्याने मला धमकी दिली की तु जर मला शरीरसंबंध करु दिला नाहीतर मी मोबाईल मध्ये काढलेले फोटो हे सोशल मीडियावर तसेच तुझ्या पतीच्या मोबाईलवर मी वायरल करेन व तुझी बदनामी करील अशी धमकी दिल्यामुळे मी भितीपोटी गप्प बसले तेव्हा माझी इच्छा नसतानाही माँरीसने त्यादिवशी माझ्यावर जबरदस्तीने शारिरीक संभोग केला व पुन्हा जबरदस्तीने माझे नग्न अवस्थेतील फोटो काढून घेतले.

त्यादिवशी माँरीसने मला अशी धमकी दिली की त्याचे संबंध कुप्रसिध्द दाउद व त्याच्या गँगशी आहेत व तु जर घडलेला प्रसंग कोणास सांगितला तर मी तुझ्या पतीची हत्या करु शकतो त्यामुळे मी तणावाखाली व दबावाखाली येऊन अत्यंत भयभीत परिस्थितीत दुपारी 4.00 वाजण्याचे सुमारास घरी परत आली. माझ्यासोबत केलेल्या प्रकाराच्या बदनामीच्या व मॉरिस याने माझ्या पतीला मारण्याची धमकी दिल्यामुळे मला खुप भीती वाटल्याने त्या भीतीमुळे मी माझ्या पतीला व इतर कोणालाही मॉरिस याने माझेवर जबरदस्तीने केलेल्या संभोगाची माहिती दिली नाही. 

त्यानंतर सदर प्रकाराचा फायदा घेवून मॉरीस क्विंटीन ऑलिव्हर नरोन्हा हा हेतूपुरस्सर माझे पती व कुटूंबातील सदस्य घरी नसल्याची माहिती घेवून माझ्या राहत्या घरी वारंवार येत होता व वरीलप्रमाणे चित्रीत केलेल्या चित्रीकरणाचा प्रसार सोशल मिडीया व राहत्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये केले जाईल अशी धमकी देवून माझेवर वारंवार माझे राहत्या घरी येवून माझी इच्छा नसतानाही त्याने माझ्यावर अनेक वेळा जबरी संभोग करून लैंगिक अत्याचार केले व जाताना मला वारेवार म्हणायचा की मी सध्या पैशांच्या अडचणीत असून तुम्ही दिलेल्या पैशांएवजी तुम्हाला एक फ्लॅट घेवून देईल. 

त्यानंतर मला समजले की मॉरिस याने खोटे आश्वासन देवुन माझी व माझ्या पतीची फसवणूक केल्याची खात्री झाली. 

माझे पती हे दिनांक 11/03/2022 रोजी संध्याकाळी पाच वाजण्याचे सुमारास माँरीस याच्या कार्यालयात जाऊन गुंतवलेल्या रकमेची व त्यावरील व्याजाच्या परताव्याची मागणी केली. तेव्हा मॉरीसने माझ्या पतीला दाऊद हस्तकांमार्फत हत्या करण्याची धमकी दिली व असे सांगितले की त्याच्या मनात येईल तेव्हा तो माझ्याशी संभोग करेल व म्हणाला की "शुकर कर मैं तरी बिवीको लेके नही भागा" माँरीस याच्या कार्यालयात घडलेली घटना माझ्या पतीने मला सांगितली. 

त्यांनी मला माँरिस तुझ्याबाबत असा का बोलला? असे म्हणुन विचारले असता मी माझ्या पतीला माझ्यावर मॉरिस याने केलेल्या लैंगिक अत्याचार व दिलेल्या धमकीबाबतची माहिती सांगितली व त्यानंतर आम्ही माझ्यावर झालेल्या अत्याचाराबाबत पोलिसांत तक्रार देण्याचे ठरविले.

तरी मॉरीस याने माझ्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराचा, विनयभंगाचा, जबरदस्ती संभोगाचा तसेच माझ्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने माझे नग्न अवस्थेत काढलेली चित्रीकरण सोशल मिडीयामध्ये दाखवुन बदनामी करील याची भीती वाटल्याने मी अदयाप तक्रार दिली नाही. तसेच आम्हाला खोटे अमिष दाखवून आम्ही त्याचे परदेशी सौंदर्य प्रसाधने वितरीत करण्याचे पेटंट हक्क असलेल्या व्यवसायात केलेल्या 88 लाख रुपयावर 3 टक्के प्रति महीना व्याज देतो असे म्हणुन आमची आर्थिक फसवणूक केली असून याबाबत तो वारंवार आम्हाला तुमचे पैसे देतो असे आश्वासन दिल्यामुळे त्याचेविरुध्द आम्ही आजपावेतो तक्रार दिली नाही तरी माँरीस नरोन्हा याचेविरुध्द माझी कायदेशीर तक्रार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT