Gadchiroli: कुंभारे कुटुंबाला सुनेने ‘या’ विषाचा भरवला घास, ‘यासाठी’ काढला काटा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

gadchiroli massacre revealed that daughter in law and aunt used banned thallium metal to kill 5 members of the kumbhare family
gadchiroli massacre revealed that daughter in law and aunt used banned thallium metal to kill 5 members of the kumbhare family
social share
google news

Gadchiroli 5 Person Murder Case poison: व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली: अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथील कुंभारे परिवारातील पाच जणांच्या हत्येने अवघा गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा हादरून गेला आहे. सुनेनेच अख्ख्या कुटुंबाला संपवल्याची खळबळजनक घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणातील वेगवेगळी माहिती देखील आता उजेडात येत आहे. अत्यंत विषारी द्रव्याचा वापर करुन सून संघमित्रा कुंभारे (Sanghmitra Kumbhare) हिने ही हत्या (Murder) केल्याचं समोर आलं आहे. जगातील अनेक देशांनी प्रतिबंधित केलेल्या थॅलियम धातूचा वापर केलेल्या विषाचा वापर करुन संघमित्राने पाच जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हे आता वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. आरोपी संघमित्रा हिने थॅलियम धातू तेलंगणा राज्यातून मिळविल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असले तरी त्याचा मुख्य स्त्रोत शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे. (gadchiroli massacre revealed that daughter in law and aunt used banned thallium metal to kill 5 members of the kumbhare family)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

26 सप्टेंबर 2023 रोरजी कुंभारे कुटुंबातील प्रमुख शंकर कुंभारे हे आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबरला पत्नी विजया यांचा मृत्यू झालेला. पुढे 8 ऑक्टोबरला कुभांरेंची विवाहित मुलगी कोमल दहागावकर, 14 ऑक्टोबरला आनंदा उराडे, तर 15 ऑक्टोबरला संघमित्राचा पती रोशन याचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी त्याची दखल घेतली.

हे ही वाचा >> Gadchiroli: सून आणि मामीने 5 जणांना कसा भरवला विषाचा घास?, मृत्यूच्या तांडवाची Inside Story

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी पाचही जणांच्या मृत्यूप्रकरणी संघमित्रा कुंभारे आणि मृत रोशन कुंभारे याची पत्नी रोजा रामटेके यांना ताब्यात घेतलं. ज्यानंतर या प्रकरणातील गूढ उकललं गेलं. न्यायालयाने दोघींना 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. तपासादरम्यान दोघींनी धातूमिश्रीत विष देऊन अतिशय थंड डोक्याने पाचही जणांचा जीव घेतल्याची कबुली दिली.

हे वाचलं का?

शंकर कुंभारे यांचा लहान मुलगा रोशन याचा अकोला जिल्ह्यातील पातूर येथील संघमित्रा गवई हिच्याशी डिसेंबर 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. दोघेही पोस्टात नोकरीला होते. प्रेमविवाह मान्य न झाल्याने एप्रिल 2023 मध्ये संघमित्राच्या वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी संघमित्राने तिच्या सासरकडील सर्वांची अत्यंत थंड डोक्याने हत्या केली.

मृत्यू झालेल्या पाच जणांचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. यातील पाचही जणांमध्ये जी लक्षणे दिसत होती ती संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके यांच्यात दिसत नव्हती. त्यामुळे त्या ठणठणीत दिसत होत्या. यावरुन पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सगळ्यांनाच हादरवून टाकणारी माहिती पुढे आली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Gadchiroli: भरवला विषाचा घास… घरातल्याच 2 बायकांनी संपूर्ण कुटुंबच संपवलं, विदर्भात खळबळ

कृषीशास्त्रात पदवीधर असलेल्या संघमित्राला थॅलियम धातूबाबत माहिती होती. इंटरनेटवर तिने सर्चसुद्धा केलं होतं. तिने थॅलियम आणण्याची जबाबदारी मामी रोजा रामटेके हिच्यावर सोपवली होती. तिच्याच मदतीने तेलंगणातून थॅलियम आणण्यात आल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.

ADVERTISEMENT

थॅलियम धातूचं विष नेमकं कसं असतं?

हे विष पाण्यात टाकून पाहिले असता ते पाण्यात विरघळणारे, रंगहीन, गंधहीन व चवहीन असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी संधी मिळेल तेव्हा ते विष कुंभारे कुटुंबीयांच्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये मिसळले. या घटनेतील तीन अन्य पीडित उपचार घेत असून त्यांची प्रकृती आता सुधारत आहे

पारासदृश थॅलियम धातू हा रंगहीन, गंधहीन व चवहीन असल्याने हळूहळू शरीरात पसरुन मृत्यूस कारणीभूत ठरतो. जगातील काही मोठ्या नेत्यांच्या हत्येत थॅलियमचा वापर केला गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अमेरिकेसह काही देशांमध्ये या धातूवर बंदी आहे. असं असतानाही अत्यंत विषारी थॅलियम हे संघमित्राने नेमकं कसं मिळवलं याबाबतचं गूढ उकलण्याचं मोठं आव्हान चंद्रपूर पोलिसांसमोर आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT