Honeymoon सेलिब्रेट करताना प्रदीप आणि शिवानीचा कसा झाला मृत्यू? हादरवून टाकणारी गोष्ट आली समोर
Ayodhya Crine News: अयोध्येतील प्रदीप आणि शिवानी यांच्या लग्नाच्या रात्री काय घडले? हे सध्या तरी एक गूढच आहे. आता या प्रकरणात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हनिमूनदरम्यान नव विवाहित जोडप्याचा झालेला मृत्यू

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा-बायकोमध्ये काय घडलं?

दोघांच्या मृत्यूबाबत धक्कादायक बाब आली समोर
Crime News: अयोध्या: अयोध्येतील प्रदीप आणि शिवानी यांच्या लग्नाच्या रात्री काय घडले? हे सध्या तरी एक गूढच आहे. याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण पोलीस या घटनेबाबत काहीही बोलण्याचे टाळत आहेत. लग्नाच्या 24 तासांच्या आत दोघांचाही मृत्यू झाला. त्या रात्री त्यांना काय झाले? हा प्रश्न अजूनही कायम आहे.
पोलिस तपासात शिवानीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तर प्रदीपचा मृतदेहही फासावर लटकलेला आढळला होता. प्रदीपच्या मोबाइलवर कोणीतरी मेसेज पाठवला होता, असेही तपासात समोर आले आहे. असे मानले जाते की, प्रदीपने शिवानीला सांगितले की, 'तुझे आधीच प्रेमसंबंध होते.' लग्नाच्या रात्री प्रदीप आणि शिवानीमध्ये याच गोष्टीवरून वाद झाल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा>> पोटच्या तीन मुलींवर वासनांध बापाकडून वारंवार बलात्कार, एका मुलीचा 4 वेळा गर्भपात
असा अंदाज लावला जात आहे की, यादरम्यान शिवानी आणि प्रदीपमध्ये भांडण झाले असावे आणि नंतर प्रदीपने शिवानीचा गळा दाबला असावा, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा.
दरम्यान, प्रदीपच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, प्रदीप खूपच शांत आणि साधा होता. अशा परिस्थितीत, शिवानीच्या मृत्यूनंतर तो घाबरला आणि नंतर भीतीमुळे त्याने आत्महत्याही केली असावी.
खोलीत तिसरं कोणीही शिरलं नाही!
दरम्यान, ज्या ठिकाणी घडली त्या खोलीची पोलिसांनी संपूर्ण झडती घेतली आहे. खोलीत तिसऱ्या व्यक्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, पोलीस गृहीत धरत आहेत की, खोलीत तिसरंही कोणीही आलं नव्हतं. पोलिसांच्या मते, लग्नाच्या रात्री खोलीत फक्त शिवानी आणि प्रदीप उपस्थित होते.
हे ही वाचा>> Crime : मुलीशी मैत्री केली, खासगी क्षणांचे फोटो काढले, तेच फोटो नंतर ब्लॅकमेल करायला वापरले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
असे मानले जाते की, जे काही घडले ते या दोघांमध्ये घडले आणि ही घटना काही वादानंतरच घडली. पण हे सर्व फक्त अंदाज आहेत. आतापर्यंत कोणीही या प्रकरणात काहीही बोलण्यास तयार नाही. प्रदीपच्या मोबाइलवर काही मेसेज आल्याचेही सांगण्यात येत आहे. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. पण हा मेसेज काय होता आणि तो कोणी पाठवला होता हे स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणातील पूर्ण सत्य अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलिसांना समोर फक्त एकच थेअरी आहे. आतापर्यंत त्या रात्रीची संपूर्ण कहाणी उघड झालेली नाही.
दोघांवरही करण्यात आले अंत्यसंस्कार
आता शिवानी आणि प्रदीप यांचे अंतिम संस्कार झाले आहेत. शिवानीच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे. तर दोन्ही कुटुंबांमध्ये गोंधळ आहे. दोन्ही कुटुंबांचा आनंद उध्वस्त झाला आहे. प्रदीप आणि शिवानी यांच्या लग्नाच्या रात्री नेमके काय झाले हे कोणालाही समजू शकलेलं नाही.
पोलिसांनी काय सांगितलं?
या प्रकरणावर कॅन्ट पोलीस स्टेशनचे प्रभारी पंकज सिंह म्हणाले की, 'सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पुरावे गोळा केले जात आहेत. लवकरच ही घटना उघड होईल.'
दरम्यान, पोलिसांनी मृत प्रदीपचा मोबाइल फोन ताब्यात घेतला आहे. त्यामुळे यामधून अधिक गोष्टी उघड होण्याची दाट शक्यता आहे.