Crime : मन सुन्न करणारी घटना! पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच झोपला पती…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Brutal murder of the shop owner by a servant with the help of his friend in Mumbai
Brutal murder of the shop owner by a servant with the help of his friend in Mumbai
social share
google news

Crime news :

ADVERTISEMENT

सोनभद्र : उत्तर प्रदेशातील सोनभद्रमधून एका ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या हत्येची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील कोरची टोला येथे एका मद्यधुंद व्यक्तीने रागाच्या भरात पत्नीची निर्घृण हत्या केल्याची आणि त्यानंतर तो त्याच मृतदेहाजवळ झोपला होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून आरोपीला अटक केली आहे. (In Sonbhadra, UP, a drunken man brutally killed his wife, After this he slept near the dead body)

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राम प्यारे भुईया (50) असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. शनिवारी संध्याकाळी तो दारूच्या नशेत घरी आला. यावेळी त्याने पत्नी ललिता देवीसोबत कशावरून तरी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचं रुपांतर भांडणात झालं. यावेळी रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात काठीने वार केले. त्यात पत्नी ललिताचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : संजय राऊतांना धमकी देणारा सापडला, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

यानंतर आरोपी राम मृतदेहाजवळ झोपला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि हत्येसाठी वापरलेली काठी जप्त केला. सोबतच आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातही घडली होती अशाच प्रकारची घटना :

अशा प्रकारची घटना गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील पालघरमधून समोर आली होती. येथे एका व्यक्तीने आधी पत्नीची हत्या केली. त्यानंतर कार्यालयात जाऊन काम केले. तिथून थेट पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःला अटक केली होती. प्रभू विश्वकर्मा (26) याचा विवाह अनिता (25) सात वर्षांपूर्वी झाला होता. दोघेही नालासोपारा परिसरात राहत होते. प्रभू अनेकदा कामानिमित्त मालाडला येत-जात होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : नातेवाईकासोबत अनैतिक संबंध, OYO हॉटेलमध्ये विवाहित महिलेसोबत घडली भयंकर गोष्ट

दरम्यान, त्याला त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाचा संशय आला. याबाबत त्याने विचारणा केली असता अनिताने असे काही नसल्याचे सांगितले. असे असूनही प्रभू तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या दिवशीही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यानंतर प्रभूने पत्नीचा चेहरा उशीने दाबून गळा दाबून खून केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT