300 रूपयांसाठी नग्न केलं, नंतर धारदार शस्त्राने… ठाण्यात मुलासोबत नेमकं काय घडलं?
ठाण्यातील कळव्यामध्ये एकाने मित्राकडून 300 रुपये उसने घेतले होते, मात्र ते देण्यास त्याला उशिर झाला. त्यामुळे ज्याने पैसे दिले होते, त्याने 300 रुपयांसाठी मुलाला नग्न करुन बेदम मारहाण करत त्याच्या धारदार शस्त्राने वारही केला आहे.
ADVERTISEMENT
Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील कळवा (Thane Kalwa) परिसरात आर्थिक देवाण-घेवाणीच्या (Financial Problem) वादातून 17 वर्षाच्या मुलाला विवस्त्र करून त्याला मारहाण (Stripped and beaten) केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाने एकाकडून उसने पैसे घेतले होते. त्या पैशाच्या देवाण घेवाणीवरुन त्याला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पैसे देण्यास टाळाटाळ
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ज्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे. त्याने आरोपीकडून गेल्या वर्षी 300 रुपये उसने घेतले होते. काही दिवसांनी त्याने आपले पैसे त्याच्याकडे मागायला त्याने सुरुवात केली. मात्र त्या मुलाने पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे देण्यास टाळाटाळ आणि वेळेत दिले नाहीत म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करत त्याच्याकडे असलेले ब्लूटूथ इअरफोनही त्याच्याकडून हिसकावून घेण्यात आले.
हे ही वाचा >> वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी, दोघा तरुणांनी केली आत्महत्या
आरोपीच्या घराकडे गेला अन्
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, हिसकावून घेतलेले ब्लूटूथ इअरफोन आणण्यासाठी तो आरोपीच्या घरी गेला होता. घरी गेल्यानंतर आरोपीच्या आईने त्याचे ते इअरफोन त्याला परतही दिले होते. त्याचे इअरफोन आईने त्याला परत दिल्याचे समजताच आरोपीला त्याचा राग अनावर झाला. त्यानंतर त्याने आणखी एका मित्राला बरोबर घेऊन त्या मुलाच्या घरी गेला.
हे वाचलं का?
त्याच्याच बेल्टने त्याला मारहाण
आरोपीने त्याच्या घरी गेल्यानंतर पुन्हा त्याने आपले पैसे मागण्यास सुरुवात केली, त्याचवेळी त्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने त्याच्याकडील बेल्ट घेऊन बेल्टने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करत त्याला निर्वस्त्र करून आणखी मारहाण केली. त्यामध्ये तो जखमी झाला असून याप्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आईने केली तक्रार
ही घटना घडल्यानंतर पीडित मुलाने याची माहिती पहिल्यांदा त्याने आपल्या आईला दिली. त्यानंतर त्याच्या आईने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करुन मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणी तौसीफ खानबंदे आणि सामिल खानबंदे यांना ताब्यात घेण्यात आले असून या दोघांवर 327, 323, 504, 506, 34 या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Relationship Tips: जोडीदार निवडताना ‘ही’ चूक करतात 99 टक्के जण, अरेंज मॅरेजवाल्यांनी तर…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT