Nagpur Crime : सून मानसिक रुग्ण, सासूबरोबर वाद होताच, चाकूने गळाच…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Nagpur Crime mother in law murder crime
Nagpur Crime mother in law murder crime
social share
google news

Nagpur Crime : मानसिक आजारने त्रस्त असलेल्या एका महिलेने आपल्या 80 वर्षाच्या सासूवर (old mother in law) चाकुने हल्ला करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी पूनम आनंद शिखारवार (वय 36) हिला अटक केली आहे. ही दुर्देवी घटना शनिवारी घडल्याचेही पोलिसांनी सांगितेल. (mentally ill daughter-in-law stabs elderly mother-in-law and slits her throat, incident in nagpur)

ADVERTISEMENT

औषधोपचरांकडे दुर्लक्ष :

या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेली आरोपी पूनम गेल्या काही दिवसांपासून ती मानसिक आजाराने त्रस्त आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पूनमे तिच्याव सुरु असलेल्या औषधोपचाराकडे दुर्लक्ष केले आहे. तिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले नसल्याचेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> महाराष्ट्रानंतर तेलंगणा! मागास जातीतील 2 तरुणांना उलटं लटकावलं, खाली जाळ लावून केली बेदम मारहाण; कारण…

चाकूने सपासप वार

पूनमवर गेली काही दिवसांपासून मानसिक रुग्ण आहे. तिच्यावर उपचार चालू असून तिचे तिच्या कुटुंबीयांबरोबरही गेल्या काही दिवासांपासून ती वाद घालत होती. त्यानंतर पूनमने आपल्या सासूबरोबर वाद घालत तिने तिचे सासू तारादेवी यांच्यावर चाकूने वार करुन त्यांचा गळा चिरला. पूनम एवढ्या वरच न थांबता तिने वृद्ध सासूवर अनेक वार केले आहेत. त्या हल्ल्यातच सासूचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे वाचलं का?

शेजऱ्यांनी पोलिसांना सांगितले

पूनमने सासूवर वार केल्याचे कुटुंबीयांशी आणि शेजाऱ्यांशी लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला. त्यानंतर सासूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हे ही वाचा >> Mumbai Crime News : एअर होस्टेस तरुणीची हत्या, पवईतील फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

प्रचंड रक्तस्त्राव

सायंकाळची वेळ असताना पूनम घरामध्ये काम करत बसली होती, त्यावेळी भाजी कापण्याचा चाकू तिच्या हातात होता. त्याच वेळी सासू-सुनेमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सुनेने सासूवर थेट चाकूने वार करायला सुरुवात केली. त्यानंतर रक्तस्त्राव जास्त झाल्याने सासूचा जागीच मृत्य झाल्याचे सांगण्यायत येत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT