Mumbai Bhandup School Case : भांडुपमध्ये नामांकित शाळेत 3 विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन, बदलापूरची पुनरावृत्ती?
मुंबईमधील भांडुप परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत तीन विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. शाळेत आलेल्या लिफ्ट मेकॅनिककडून हा गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भांडूपमध्ये बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती?
10-11 वर्षांच्या विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन केल्याची घटना
Mumbai Bhandup School Molestation Case : मुंबईमध्ये पुन्हा एका धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडूप परिसरातील एका नामांकित शाळेत पुन्हा एकदा चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पालकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला असून, संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांना आता आपल्या पाल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावत असल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra New CM LIVE : "अमित शाहांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब"
भांडुप परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, 10 ते 11 वर्षांच्या तीन मुलींवर गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली आहे. शाळेत आलेल्या लिफ्ट मेकॅनिककडून हे गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पालकांनी याबद्दल तक्रार केल्यानंतर भांडुप पोलिसांनी तातडीने पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय. त्यानंतर शाळेनंही या लिफ्ट मेकॅनिकविरोधात कारवाई केली असून, तक्रार नोंदवल्याची माहिती आहे. पोलिसांनी या तक्रारीनंतर आरोपीला अटक केल्याचं समजतयं.
हे ही वाचा >> Maharashtra New CM: अमित शाहांच्या घरी बैठकीत 'हे' ठरलं, अजितदादांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी?
27 नोव्हेंबररोजी विद्यार्थीनी शाळेत असताना दुपारी दीड वाजेच्या सुमारास योगाची प्रॅक्टीस करत होत्या. यावेळी इमारतीच्या बेसमेंटरमध्ये लिफ्ट मेकॅनिक मुलींची छेडछाड करत असल्याचं मुलींना आपल्या शिक्षकांना जाऊन सांगितलं. यावेळी शिक्षकांनी सीसीटीव्ही तपासले. यावेळी लिफ्ट मेकॅनिक तीन मुलींसोबत छेडछाड आणि अश्लील चाळे करत असल्यचाचं निदर्शनास आलं. त्यावेळी शिक्षकांनी आरोपीला पकडून ठेवलं. नंतर पोलिसांना तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी हा मूळ छत्तीसरडचा रहिवासी असून, तो लिफ्ट मेकॅनिक म्हणून शाळेत थर्ड पार्टीच्या माध्यमातून काम करतो. लिफ्ट दुरूस्त करायला आल्यानंतर या आरोपीने लिफ्ट ग्राऊंड फ्लुअरवर थांबण्याऐवजी ती थेट अंडरग्राऊंडमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत, तिथे विद्यार्थीनींशी गैरवर्तन केल्याची माहिती आहे.
बदलापूरमध्ये गेल्या सहा महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीनं शाळेत साफसफाई करणाऱ्या व्यक्तिकडून चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी थेट बदलापूर स्टेशनवर ठिय्या मांडत रेल्वे रोखली होती. या घटनेत पुढच्या काळात अक्षय शिंदे नावाच्या आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तर इतर आरोपींना काय शिक्षा होते यावर सध्या सर्वांचं लक्ष आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT