Crime News : प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं, जिवंत राहिलाच तर रेडी होता दुसरा प्लॅन, घरात सापडलं...
Mumbai Crime News : मुंबईतील गोरेगाव परिसरातील बंजारी पाडा येथे राहणारी 28 वर्षीय रंजू चौहान या महिलेनं पतीची हत्या केली आहे. महिलेच्या प्रियकराचं नाव शाहरूख असून, पोलीस त्याच्या शोधात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील गोरेगावमध्ये थरारक घटना

पतिला संपवण्यासाठी केले होते दोन प्लॅन

बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीने केलं कांड
Mumbai Crime News : मुंबईतील गोरेगावमध्ये एका महिलेनं प्रियकराशी लग्न करण्यासाठी आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा गुन्हा करण्यासाठी महिलेचा प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांनीही तिला साथ दिली. मुंबई पोलिसांनी 24 तासांच्या आत हत्येचा हा गुन्हा उघड करत आरोपी पत्नीसह अन्य दोघांना अटक केली आहे. तसंच महिलेचा प्रियकर शाहरुख हा सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेतायत.
मुंबईतील गोरेगाव परिसरातील बंजारी पाडा येथे राहणारी 28 वर्षीय रंजू चौहान या महिलेनं पतीची हत्या केली आहे. प्रियकर आणि मित्रांच्या मदतीनं रंजूने आपल्या 36 वर्षीय पती चंद्रशेखर चौहानला संपवलं. चंद्रशेखर हा चित्रपटाच्या सेटवर काम करायचा. चंद्रशेखर बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यावर त्यांना ट्रॉमा केअर रुग्णालयात नेलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
हे ही वाचा >> अंतराळातून परतलेल्या सुनिता विल्यम्स चालणं विसरतील का?
फोन कॉल डिटेल्सनं संपूर्ण रहस्य उघड केलं
सुरुवातीला रंजूने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की रात्री तिचा नवरा ठीक होता आणि झोपायला गेला होता. मात्र पोलिसांनी तपास सुरू करून त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले असता, संपूर्ण सत्य बाहेर आलं आहे. रात्री दीड वाजता झोपले होते असं सांगत असलेल्या रंजूने अनेक फोन कॉल केल्याचं पोलिसांना समजलं. या कॉल्सची सखोल चौकशी केली असता, या क्रमांकांवर सातत्यानं संभाषण सुरू असल्याचं आढळून आलं.
महिलेनं आपला गुन्हा कबूल केला
पोलिसांनी कडक चौकशी केली असता, रंजूने सत्य उघड केलं. तिने प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून चंद्रशेखरची हत्या केल्याची कबुली दिली. या महिलेनं हत्येचा सगळा प्लॅन आधीच तयार केली होती. चंद्रशेखर झोपलेला असताना, तिन्ही आरोपींनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला. एवढंच नाही, तर गळा दाबून नवऱ्याचा मृत्यू झाला नाही तर अन्य मार्गाने मारू असा प्लॅन करत महिलेनं काठ्या आणि इतर वस्तूही बॅकअप म्हणून तयार ठेवल्या होत्या.
प्रियकराच्या शोधात पोलीस
हे ही वाचा >> Maharashtra Weather : मराठवाड्यात विजांचा कडकडाट! 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या हलक्या सरी, जाणून घ्या आजचं हवामान
दरम्यान, या घटनेनंतर खूनप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी रंजू चौहान आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचं नाव 20 वर्षीय मोईनुद्दीन लतीफ खान असं आहे. हत्येनंतर प्रियकर शाहरुख फरार झाला असून, त्याच्या शोधात पोलीस सतत छापे टाकत आहेत. शाहरुखलाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे.