Nagpur Crime: लहान बहिणीसमोर 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 20 रुपये दिले अन्...

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

9 वर्षाच्या मुलीवर घरात घुसून बलात्कार

point

आई-वडील घरात नसल्याचा फायद घेत नराधमाचं घृणास्पद कृत्य

point

5 वर्षीय लहान बहिणीसमोरच मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार

Nagpur Minor Rape Case: नागपूर: नागपूर येथे एका अवघ्या 9 वर्षाच्या निष्पाप मुलीवर तिच्याच लहान बहिणीसमोर बलात्कार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेला दोन दिवस उलटून गेलेले असतानाही नागपूर पोलीस अद्यापही आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही. आता नागपूर पोलिसांनी बलात्कारातील या आरोपीला अटक करण्यासाठी एक रेखाचित्र जारी केले आहे. (nagpur crime man raped a 9 year old girl in front of her 5 year old younger sister)

ही घटना नागपुरातील पारडी भागात घडली आहे. एक माणूस आला आणि त्यांच्या पालकांबद्दल विचारू लागला, परंतु जेव्हा मुलीने सांगितले की घरी कोणीही नाही, तेव्हा त्या व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून 9 वर्षाच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या लहान बहिणीसमोरच या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केलं. इतकेच 

जेव्हा लहान बहिणीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपी इसमाने 5 वर्षीय मुलीला 20 रुपयांची नोट देऊन शांत राहण्यास सांगितलं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी नागपूर पोलीस काहीही बोलण्यास तयार नसले तरी पारडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट यांनी फोनवर बोलताना बलात्काराच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. 

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी बलात्काराच्या आरोपीचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे.  कारण घटनेला 3 दिवस उलटले तरी आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ADVERTISEMENT

'त्या' घटनेवरून आदित्य ठाकरेंची जहरी टीका

नागपुरातील या घटनेने आता राजकीय रंग घेतला आहे, शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी X वर ही घटना पोस्ट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

ते म्हणाले, 'महाराष्ट्रासाठी, बेकायदेशीर आणि बेशरम मुख्यमंत्री, गद्दार मिंधे, हे प्रशासनाबाबत प्रचंड अनभिज्ञ आहेत. ते त्यांच्या फोटो ऑप्ससाठी अभिनेत्यांना आमंत्रित करण्यात व्यस्त आहेत. त्यांनी राज्य अराजकतेत बुडण्यासाठी सोडून दिलं आहे. कायद्याची कोणालाही भीती राहिलेली नाही. तर गृहमंत्री हे गलिच्छ राजकारणात व्यस्त आहे.' अशा भाषेत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT