Pune Accident : 'अग्रवालने माझ्या हत्येची छोटा राजनला दिलेली सुपारी'
Pune Accident News : ''2009 साली वडगारशेरी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावरून मी आमदारकीसाठी उभा होतो. या निवडणुकीच्या अगोदरपासून माझे राम अग्रवालशी मैत्रीचे संबंध होते. त्यावेळेस निवडणुकीच्या वर्षभर अगोदरपासून छोटा राजनचे माझ्या फोनवर धमकीचे फोन यायचे, असे अजय भोसले यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Pune Accident News, Vishal Agarwal Father Surendra Agarwal : पुण्याच्या कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघाताचं प्रकरण राज्यासह, देशभरात चांगलच पेटलं आहे. या प्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येत असतानाच आता अग्रवाल कुटुबियांशी संबंधित एक जुनी अंडरवर्ल्डशी जोडली गेलेली घटना चर्चेत आली आहे. ज्यामध्ये अल्पवयीन आरोपीचे आजोबा म्हणजेच विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) यांनी छोटा राजनला (Chhota Rajan) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी दिली होती.सुदैवाने या हल्ल्यातून अजय भोसले बचावले होते. ही घटना 2009 साली घडली होती. त्यामुळे ही संपूर्ण घटना काय आहे? हे जाणून घेऊयात. (pune porsche accident news surendra agarwal tipped to chota rajan to kill shivsena ajay bhosale 2009 story crime news)
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अजय भोसले यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी 2009 सालची ही संपूर्ण घटना सांगितली आहे. ''2009 साली वडगारशेरी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावरून मी आमदारकीसाठी उभा होतो. या निवडणुकीच्या अगोदरपासून माझे राम अग्रवालशी मैत्रीचे संबंध होते. त्यावेळेस निवडणुकीच्या वर्षभर अगोदरपासून छोटा राजनचे माझ्या फोनवर धमकीचे फोन यायचे, असे अजय भोसले यांनी सांगितले.
हे ही वाचा : 90 मिनिटांत दारूवर उडवले 48 हजार, पबमध्ये आरोपीने काय केलं?
अजय भोसले पुढे म्हणाले, 'अग्रवाल भावंडांचे मालमत्तेवरून वाद सुरु होते. 1000, 1200 कोटींचा काही व्यवहार होता. राम अग्रवाल सुरेंद्र अग्रवालला पैसै देत नव्हता'. त्यावेळेस सुरेंद्र अग्रवालने छोटा राजनला माझ्या हत्येची सुपारी दिली होती. 'अजय भोसले माझ्या भावाचा खास मित्र आहे, तोच त्याला सगळा सपोर्ट करतो. म्हणून त्याने मला मारायची सुपारी दिली होती, असे अजय भोसले यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
''निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर त्या दिवशी सकाळी 10 ते 10.30 वाजता जर्मन बेकरी जवळ माझ्यावर गोळी झाडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ज्यामध्ये सुदैवाने आम्ही बचावलो होतो. त्यानंतर आम्ही हल्लखोरांच्या पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा त्यांनी वळून आमच्यावर पुन्हा एकदा गोळीबार केला. यावेळी गोळी थेट काचेच्या आरपार येऊन माझ्या मित्रांच्या छातीत घुसली होती. या घटनेचा तपास त्यावेळी बंद गार्डन पोलीस करीत होती'', असे अजय भोसले यांनी सांगितलं.
हे ही वाचा : 'शिंदे साहेब, गजानन कीर्तिकरांची त्वरित हकालपट्टी करा', शिवसेना नेता संतापला
दरम्यान या घटनेत ज्यावेळेस वर्षभरानंतर या हल्ल्यातील आरोपीला अटक झाली. तेव्हा आरोपींनी सुरेंद्र अग्रवालने छोटा राजनला हत्येची सुपारी दिल्याची कबुली दिली होती. आणि ज्यावेळेस छोटा राजनला अटक झाली, त्यावेळी त्याचे सगळे केसेस सीबीआयकडे वर्ग करण्यात आली. ही केस आमची सीबीआयमध्ये आहे. आमच्या सगळ्यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सुरेंद्र अग्रवालला अटक झाली पाहिजे होती. पण अजून त्यांना अटक झाली नाही आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणात 8 आरोपी आहेत, असे देखील अजय भोसले यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT