Pune Accident : मुलाला वाचवण्यासाठी केल्या 'या' गोष्टी; अग्रवालवर दाखल होणार दोन गुन्हे
Drunk and Drive Case of Pune : पुण्यात घडलेल्या पोर्श कार अपघातातील नवीन अपडेटनुसार, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसंच या प्रकरणात आणखी मोठी अपडेट आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
खोटी माहिती देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
नेमकं खरं काय? ड्रायव्हरने स्वत: सांगितलं...
व्हायरल रॅप व्हिडीओ मागील सत्य काय?
पुणे : Pune Porsche Car Accident : पुणे पोलिसांनी (Pune Police) ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणातील ड्रायव्हरच्या भूमिकेवरही ते बोलले. पुण्यात घडलेल्या पोर्श कार अपघातातील नवीन अपडेटनुसार, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. (Pune porsche car Accident Two cases will be filed against Vishal Agarwal for trying to destroy evidence to save accused minor son)
ADVERTISEMENT
खोटी माहिती देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
पोलीस तपासात समोर आले आहे की, विशालने त्याच्या ड्रायव्हरला फोन केला होता. तू गाडी चालवत होता असं पोलिसांना सांग, त्याबदल्यात तुला बक्षिस मिळेल असं विशाल अग्रवालने ड्रायव्हरला सांगितल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा : "मविआचा महायुतीला फटका बसेल"; शिंदेंच्या नेत्याचा अंदाज
ड्रायव्हरला खोटा जबाब देण्यास विशाल अग्रवालनेच भाग पाडले. त्यामुळे त्याच्यावर खोटी माहिती देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने दोन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. विशालविरुद्ध कलम 201 अन्वये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
हे वाचलं का?
यासोबतच आरटीओच्या तक्रारीनंतर विशालविरुद्ध कलम 420 अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारण, पोलिसांना यापूर्वी पोर्श कारचे रजिस्ट्रेशन झाले होते असे सांगण्यात आले होते, पण कारचे रजिस्ट्रेशन नव्हते झाले, त्यांनी खोटी माहिती दिली होती.
हेही वाचा : आरोपी की, ड्रायव्हर... कोण चालवत होतं पोर्श कार? अखेर सत्य आलं समोर
नेमकं खरं काय? ड्रायव्हरने स्वत: सांगितलं...
तसंच या प्रकरणात आणखी मोठी अपडेट आली आहे. ड्रायव्हर गंगाराम पुजारी याने पोलिसांना जबाब दिला आहे. अल्पवयीन मुलगाच कार चालवत होता असं त्याने स्पष्ट सांगितलं आहे. अपघात झाला तेव्हा ड्रायव्हिंग व्हिल त्याच्या हातात होती, असा कबुलीजबाब ड्रायव्हर पुजारी याने दिल्याची माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने हा कबुलीजबाब दिल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Lok Sabha 2024 : "भाजप 370 जागा जिंकणं अवघड, 4 राज्यात बसू शकतो झटका"
व्हायरल रॅप व्हिडीओ मागील सत्य काय?
दुसरीकडे, गुरुवारी (23 मे) सोशल मीडियावर एक रॅप व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला होता की, त्यात दिसणारा मुलगा पुणे अपघात प्रकरणातील आरोपी आहे. या व्हिडीओमध्ये हा मुलगा शिवीगाळ करताना आणि स्वत:ला श्रीमंत म्हणवताना दिसला. तो व्हिडीओ पाहता सगळ्यांचा हा आरोपी अल्पवयीन मुलगा आहे असा समज झाला. पण त्याच्या आईने हा त्यांचा मुलगा नसून कोणीतरी वेगळा असल्याचं एक व्हिडीओतून सांगितलं.
ADVERTISEMENT
या मुलाची आता ओळख पटली असून तो मध्य प्रदेशचा राहणारा आर्यन असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलीस आर्यनचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT