विकृतीचा कळस! अंध महिलेवर पतीसमोरच लैंगिक अत्याचार
Akola a blind women sexual assault:अंध दाम्पत्याला निर्जनस्थळी नेत अंध महिलेवर तिच्याच पतीसमोरच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेनंतर अंध दाम्पत्याने अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
ADVERTISEMENT
Akola a blind women sexual assault: अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंध दाम्पत्याला निर्जनस्थळी नेत अंध महिलेवर (blind women) तिच्याच पतीसमोरच लैंगिक अत्याचार (sexual assault) केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेनंतर अंध दाम्पत्याने अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे फिरवत आरोपी गुलाम रसुल शेख मतीनला अटक केली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. (sexual assault on blind women front of her husband shocking incident in akola)
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एक अंध दांम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे आपल्या मुलीला भेटायला जात होते.दाम्पत्याची मुलगी ही अकोल्यात (Akola) आजीजवळ राहायची. या मुलीलाच भेटण्यासाठी ते अकोल्यात आले होते. रात्री पावने 8 च्या सुमारास ते अकोला बस स्टँडला उतरले होते. तिथून त्यांना गावच्या दिशेने जायचे होते. त्यामुळे त्यांनी एक रिक्षा केली होती. ही रिक्षा अर्ध्यातच बंद पडली होती. त्यामुळे त्यांची पंचाईत झाली होती. त्यात दिग्रसमध्ये पाऊस पडत असल्याने कुटुंबियांनी त्यांना घरी येण्यास मनाई केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा : पहिलं राखी बांधून घेतली पुन्हा तिच्यासोबतच केलं लग्न, नंतर केले हे कृत्य
घरातून नकार येताच अंध दाम्पत्याने (Blind Couple) पुन्हा रेल्वे स्टेशनच्या दिशेने परतण्याचा निर्णय़ घेतला. जेणेकरून पोलीसांच्या सुरक्षेत राहता येईल. मात्र वाटेतच त्यांना एक व्यक्ती भेटला.या व्यक्तीने रेल्वे स्टेशनवर नेतो असं सांगत अंध दाम्पत्याला निर्जनस्थळी नेले. या निर्जनस्थळी जीवे मारण्याची धमकी देत अंध महिलेवर अत्याचार करण्यात आला. अंध पतीसमोरच ही संपुर्ण घटना घडली. या घटनेनंतर आरोपीने पळ काढला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान या घटनेनंतर अंध दाम्पत्याने अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाणे (Civil lines Police station) गाठत आरोपी नराधमाविरोधात तक्रार दाखल करून घेतली होती. पोलिसांनी तत्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी बस स्थानकावरून सीसीटीव्ही हस्तगत करत आरोपीची ओळख पटवून गुलाम रसुल शेख मतीनला अटक केली. या प्रकरणात आता कलम 376 आणि अपंग अधिनियम अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी दिली.
हे ही वाचा : 4 मुलं, कोट्यवधींची संपत्ती.. या आईची कहाणी वाचून तुमचंही काळीज पिळवटेल!
दरम्यान या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. तसेच या घटनेने माणूकीला काळीमा फासल्याची भावना नागरीकांमधून व्यक्त होत आहे. या घटनेने अकोला हादरलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT