उज्वल आणि नीलू 4 तासात शूट करायचे मुलींचे अडल्ट Video, अन् नंतर नवरा-बायको...
नोएडा पॉर्न व्हिडिओ प्रकरणी अटक केलेल्या उज्वल आणि नीलूबाबत आता अनेक नव्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. जाणून घ्या हे जोडपं नेमकं कशा पद्धतीने अश्लील कंटेंट तयार करत होतं.
ADVERTISEMENT

नोएडा: नोएडामधील उज्ज्वल किशोर आणि त्याची पत्नी नीलू श्रीवास्तव याला पॉर्न साईट्सना अश्लील व्हिडिओ आणि कंटेंट पुरवणाऱ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर आता महत्त्वाची माहिती समोर येऊ लागली आहे. नोएडामधील भाड्याच्या घरात चालणाऱ्या या पोर्नोग्राफिक स्टुडिओमध्ये अवघ्या 4 तासांत पॉर्न व्हिडिओ तयार करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर हे दोघंही नवरा बायको हे सगळे व्हिडिओ परदेशी पॉर्न वेबसाइट्सला विकत असल्याचे समोर आले आहे.
4 तासात शूट करायचे 'ते' Video
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने नुकतंच नोएडाच्या सेक्टर 105 मधील बंगल्यावर छापा टाकला आणि या जोडप्याला अटक केली. पथकाने त्या दोघांसोबत उपस्थित असलेल्या तीन महिला मॉडेल्सचे जबाबही नोंदवले. या प्रकरणाबद्दल स्थानिक लोकांशी बोलले असता त्यांनी सांगितले की, दररोज दोन ते तीन महिला मॉडेल्स या घरात येत असत आणि सुमारे 4 तासांनी परत जात असत.
हे ही वाचा>> उज्ज्वल-नीलूची चक्रावून टाकणारी कहाणी, फ्लॅटमध्येच Porn कंटेंट; मुलींसोबत अश्लील शूटिंगआधी...
त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, अश्लील कंटेटचा काही भाग सुमारे चार तासांत चित्रित केला जात असावा. बहुतेक मॉडेल्स सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान या घरात येत असत.
या जोडप्याचे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांशी कोणतेही संबंध नव्हते, त्यामुळे शेजारीही त्यांच्यापासून अंतर राखून होते. स्थानिक लोकांना वाटले की, हे जोडपे परदेशात राहून परतले असल्याने, त्यांना भेटायला आलेल्या महिला त्यांच्या ओळखीच्या असाव्यात. या जोडप्याने भाड्याने घेतलेल्या दुमजली घराच्या वरच्या भागात एक स्टुडिओ बांधला होता, असेही तपासात उघड झाले आहे.
ऑडिशनच्या नावाखाली महिला मॉडेल्सना बोलावून अश्लील कंटेंट बनवण्याच्या या व्यवसायाचे जाळे सायप्रससह युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्येही आहे.
हे ही वाचा>> उज्ज्वल आणि नीलूने देसी पॉर्न बनवून कसे कमवले पैसे? पाहा कसं आहे त्यांचं संपूर्ण मॉडेल
इथेच मॉडेल्सचे अश्लील व्हिडिओ हे वेबकॅमवर शूट करण्यात यायचे. ईडीचे पथक व्हिडिओपासून ते परकीय पैशाच्या व्यवहारापर्यंत अनेक मुद्द्यांचा तपास करत आहे. नोएडा पोलिसांचे म्हणणे आहे की, ईडीने स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती. या प्रकरणात, स्थानिक सेक्टर 39 पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
या जोडप्याचे नेदरलँड्समध्ये एक गुप्त खाते असल्याचाही अंदाज आहे. यामध्ये सुमारे 7 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते.
असा करण्यात आला पर्दाफाश
परकीय निधीची माहिती गोळा करणाऱ्या ईडी पथकाला अलीकडेच माहिती मिळाली होती की, नोएडामध्ये एक टोळी सक्रिय आहे जी पॉर्न साइट्ससाठी सामग्री पुरवून परदेशातून निधी मिळवत आहे. यानंतर ईडीच्या पथकाने छापा टाकला. पथकाने कंपनीचे संचालक उज्ज्वल किशोर आणि नीलू श्रीवास्तव यांना अटक केली आणि त्यांना दिल्लीला नेले.
हे जोडपे घरात बेकायदेशीरपणे स्टुडिओ तयार करून पॉर्न व्हिडिओ शूट करत होते. छाप्यादरम्यान, ईडीच्या पथकाला लाखो रुपयांची रोकड आणि या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले. त्या जोडप्याची कंपनी सायप्रसमधील एका कंपनीत काम करत होती. या जोडप्याच्या कंपनीने तयार केलेली सामग्री अनेक वेबसाइटवर चालत होती. बहुतेक वेबसाइट्स परदेशातील असल्याचे कळले आहे.