साडीने गळा घोटतो! 5 महिन्यात केल्या 9 हत्या, हल्लेखोराच्या दहशतीत महिला
गेल्या पाच महिन्यात 9 महिलांची गळा आवळून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. आता श्वान पथकाच्या मदतीने एकाला ताब्यात घेतले असले तरी या सगळ्या हत्या एकाच प्रकारे करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
UP Murder: धानवती, वीरावती, कुसुम देवी, शांतीदेवी, प्रेमवती, दुलारी देवी, रेशमा देवी, महमूदन आणि उर्मिला देवी ही ज्या महिलांची नावं आहेत.त्या सगळ्या महिलांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या फक्त हत्याच करण्यात आल्या नाहीत तर हत्या करताना एकाच पद्धतीने त्यांना ठार करण्यात आले आहे. ज्या व्यक्तीने या महिलांची हत्या (Women’s Murder ) केली आहे. त्या व्यक्तीने आधी त्या महिलांना ओढत शेतात घेऊन जात होता, आणि त्यांच्याच साडीने गळा आवळून त्यांना तो ठार करत होता. महिलेचा मृत्यू झाला हे पक्के झाले की, तो तिथून पसार व्हायचा. त्यामुळे पोलीसही (UP Police) चक्रावून गेले होते. हा प्रकार गेल्या 5 महिन्यांपासून सुरू होता. त्यामुळे 5 महिन्यात 9 महिलांची अगदी क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याने उत्तर प्रदेश हादरून गेले आहे.
ADVERTISEMENT
तुटलेल्या बांगड्या दिसल्या अन्…
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यामध्येच खुनाच्या या घटना घडत आहेत. शिशगड आणि शाही या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गावांमध्ये या घटना घडल्या आहेत. सध्याची जी घटना घडली आहे ती, जगदीशपूरमध्येच. त्या गावामध्ये एका 55 वर्षाच्या महिलेची साडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. जगदीशपूरमधील उर्मिला देवी गंगवार रविवारी दुपारी आपल्या जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मात्र बराच वेळ गेल्यानंतरही त्या घरी आल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांच्या पतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी उर्मिला देवी यांच्या तुटलेल्या बांगड्या त्यांना रस्त्याच्या कडेला आढळून आल्या होत्या.
हे ही वाचा >> मुंबई: अग्निवीर ट्रेनिंग घेणाऱ्या 20 वर्षाच्या तरुणीची Navy हॉस्टेलमध्ये आत्महत्या!
मानेवर खोल जखमा
उर्मिला देवी यांच्या बांगड्या सापडल्यानंतर मात्र त्यांचे पती वेदप्रकाश गंगवार यांनी घाबरून त्यांचा पुन्हा शेजारच्या शेतात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही अंतर आता शेतात गेल्यावर त्यांचा मृतदेहच त्यांना सापडला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, उर्मिला देवी यांचा साडीने गळा आवळण्यात आला होता. त्यांच्या डोक्यावर आणि मानेवरही खोल जखमा झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले होते. त्यांची जीभही बाहेर आली होती, त्यामुळे त्यांचा गळा आवळूनच त्यांची हत्या झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शेतात आरडाओरड केल्यानंतर नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांच्या शेताकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
हे वाचलं का?
संशयिताच्या आवळल्या मुसक्या
बरेलीचे पोलीस महानिरीक्षक राकेश सिंह यांनी सांगितले की, मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. बरेली जिल्ह्यातील शिशगढ आणि शाही भागात गेल्या पाच महिन्यांतील अशा प्रकारची ही नववी हत्या आहे. या हत्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांची दोन पथकं तयार करण्यात आली असून कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> Crime : प्रियकराचा मुलीवर बलात्कार अन् आईला तुरूंगवासाची शिक्षा, प्रकरण काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT