Crime : चहा द्यायला उशीर झाला! तलवारीने बायकोचं मुंडकंच छाटलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uttar pradesh crime wife over delay in morning tea husband sword severed the head ghaziabad crime story
uttar pradesh crime wife over delay in morning tea husband sword severed the head ghaziabad crime story
social share
google news

Uttar Pradesh Crime News : क्षुल्लक क्षुल्लक कारणावरून हत्या करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. पती-पत्नीच्या नात्यात अशा घटना सर्वाधिक घडतायत. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत चहा द्यायला उशीर झाल्याने एका पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. संतापातून पतीने घरातली तलवार काढून बायकोच मुंडकचं छाटलं आहे. या हल्यानंतरही तो थांबला नाही तर त्याने पत्नीच्या शरीरावर देखील तलवारीने वार केले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात बायकोला सोडून त्याने पळ काढला होता. या घटनेने गावात एकच खळबळ माजली आहे. (uttar pradesh crime wife over delay in morning tea husband sword severed the head ghaziabad crime story)

ADVERTISEMENT

दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या गाझियाबादच्या (Ghaziabad) भोजपूरमधील फजलगडमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळचे 6 वाजले होते. मृत महिला सुंदरी जाटव या सकाळी उठून स्वयंपाकाच्या कामाला लागल्या होत्या. यावेळी त्यांनी मातीच्या चुलीवरती चहा उकळता ठेवला होता. इतक्यात दुसऱ्या खोलीतून नवरा धर्मवीर जाटवचा आवाज येतो. “सकाळच्या चहाला इतका वेळ का लागतोय?” काय करते आहेस? पटकन घेऊन ये.’ नवऱ्याच्या अशाप्रकारे ओरडण्याचा सुंदरीलाही राग येतो आणि ती त्याला उलट उत्तर देते.

हे ही वाचा : Eknath Shinde : ‘पेग्विंन… कफनचोर… खिचडीचोर’; CM शिंदे विधानसभेत ठाकरेंवर बरसले

बायकोने उलट उत्तर देताच धर्मवीर संतापतो.किचनमध्ये जाऊन बायकोशी वाद घालायला सुरूवात करतो. आणि दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होते.याच भांडणा दरम्यान धर्मवीर खोलीत जाऊन तलवार आणतो आणि बायको सुदरीचा गळाच धडावेगळं करतो. या हल्ल्यानंतरही तो थांबत नाही आणि बायकोच्या शरीरावरही हल्ला करतो. त्यानंतर बायकोचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढतो.

हे वाचलं का?

घऱातून पलायन करताना धर्मवीर हातात तलवार घेऊन उसाच्या शेतात जातो. त्याला शेतात जाताना पाहून काहीतरी विपरीत घडल्याचा संशय गावकऱ्यांना येतो. त्यानंतर गावकरी पोलिसांना या घटनेची माहिती देतात. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सुंदरी जाटवचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवतात. यानंतर पोलीसांनी उसाच्या शेतात जाऊन धर्मवीर जाटवला अटक केली आहे. या प्रकरणी आता त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : Mla Disqualification : 7 ठरावांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवलं, शिंदेंच्या वकिलांनी पकडलं कात्रीत

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT